27 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeTech News२०२१ मध्ये ५ जी कनेक्शन मिळण्याची शक्यता

२०२१ मध्ये ५ जी कनेक्शन मिळण्याची शक्यता

जगभरातील इंटरनेट युजर्सना ५ जी कनेक्शनबाबत उत्सुकता लागली आहे जगभरात अत्यंत वेगाने ५ जी कनेक्टिव्हिटीचा प्रसार होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी भारतात अनेक स्मार्टफोन ५ जी टेक्नॉलॉजीच्या फिचरसोबत लॉन्च करण्यात आले आहेत. वनप्लसपासून सॅमसंगपर्यंत अनेक कंपन्या भारतात ५ जी नेटवर्कला सपोर्ट करणारे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. अशातच दूरसंचार कंपनी एरिक्सनने एक दावा केला आहे. जगभरात २०२६ पर्यंत ३.५ अरब ५ जी कनेक्शन असतील, तर भारतात ५ जी कनेक्शनची संख्या ही जवळपास ३५ कोटीच्या आसपास नक्की असेल, असा दावा एरिक्सनने केला आहे. एरिक्सनचे नेटवर्क अधिकारी नितीन बंसल यांनी सांगितले की, जर स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचं पहिलं ५ जी कनेक्शन २०२१ मध्येच मिळू शकतं. २०२६ पर्यंत जगभरातील ६० टक्के लोकसंख्या ५ जी सेवेचा लाभ घेत असेल. ५ जी सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावाच्या घोषणा केलेल्या वेळेनुसार, भारताला त्याचं पहिलं ५ जी कनेक्शन २०२१ मध्ये मिळू शकतं. रिपोर्टनुसार, भारतात दर महिन्याला प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यांचा सरासरी वापर १५.७ जीबी इतका आहे. जी संपर्ण जगभरातील वापरकर्त्यां पैकी सर्वाधिक आहे.

भारतातील विविध कंपन्या ५ जी कनेक्शन अपडेट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी काही मोबाईल मॉडेल्स सुद्धा ५ जी कनेक्टिव्हिटी असणारे तयार केले आहेत.  पाहूया त्यांची थोडक्यात माहिती.

२०२१ मध्ये ५ जी कनेक्शन मिळण्याची शक्यता

वनप्लस चा OnePlus ८ आणि OnePlus ८ Pro देखील ५ जी कनेक्टिव्हिटी असणारे स्मार्टफोन आहे. वनप्लस ८ ची किंमत ४१९९९ रुपयांपासून सुरु होते. तर वनप्लस ८ टी हा देखील ५ जी टेक्नॉलॉजी असणारं मॉडेल आहे. याची किंमत ४२९९९ रुपयांपासून सुरु होते.

आसुस रॉग फोन ३ गेमिंग स्मार्टफोनचं ५ जी स्मार्टफोन्सच्या यादीत सहभाग आहे. याचा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ४६९९९ रूपये आहे. आसूसच्या या स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची बॅटरीची सुविधा देण्यात आली आहे. जी ३०W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

मोटोरोला चा स्मार्टफोनही ५ जी कनेक्टिविटीसोबत येतो आहे. फोनमध्ये फुल HD OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचा १२  जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत ६४९९९ रुपये इतकी आहे.

त्याचप्रमाणे, Apple iphone सीरीज १२ चे सर्व फोन ५ जी सपोर्टसोबतचं लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone १२, iPhone १२ Mini, iPhone १२ Pro, iPhone १२ Pro Max चा समावेश आहे.

- Advertisment -

Most Popular