भारतात येत्या काळामध्ये नवीन पॉवर बँक बाजारात येणार आहे. या पॉवर बँकचं नाव एमआय पॉवर बँक बूस्ट प्रो असं आहे. क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर हे डिव्हाइस शाओमीने सूचीबद्ध केलं आहे. या डिव्हाइसची विक्री आणि शिपिंग अद्याप सुरू झालेली नाही. 15 मेपासून या पॉवर बँकचे शिपिंग सुरु केले जाऊ शकते असं म्हटलं आहे. जेव्हा हे डिव्हाइस लॉन्च केले जाईल तेव्हा कदाचित याची किंमत 3499 रुपये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली आहे. एमआय पॉवर बँकमध्ये 30,000mAh ची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरीमध्ये एका वेळी तीन डिव्हाइस पूर्ण चार्ज करण्याची क्षमता आहे. या पॉवर बँकसाठी 18W चा फास्ट चार्जिंग होण्यासाठी सपोर्ट दिला गेला आहे. म्हणजेच कमीत कमी वेळामध्ये या पॉवर बँकच्या मदतीने मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने चार्ज होतील.
या बॅटरीला देण्यात आलेल्या तीन आउटपुटपैकी एक आउटपुट प्रकार सी पोर्ट मध्ये मोडतो तर उरलेले दोन आउटपुट ए पोर्ट प्रकारचे आहेत. या पॉवर बँकद्वारे सी पोर्ट प्रकारातील डिव्हाईस चार्ज करता येणार आहे. या पॉवर बँकला दोन इनपुट पोर्ट देण्यात आलेले असून, ही पॉवर बँक यूएसबी आणि टाइप सी अशा दोन्ही प्रकारच्या चार्जरद्वारे चार्ज केली जाऊ शकणार आहे.
जर आपण पॉवर बँकच्या चार्जिंगबद्दल माहिती जाणून घेतली तर ही पॉवर बँक 24W मॅक्झिमम सपोर्ट चार्जसह देण्यात आली आहे. लो पॉवर चार्जिंगसाठी उपयुक्त असणारे स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट फीचरही यामध्ये देण्यात आले आहेत. या पॉवर बँकला सुरु करण्यासाठी पॉवर बटण दोन वेळा प्रेस करावे लागते. यामध्ये 16 लेयर अॅडव्हान्स चिप प्रोटेक्शन देण्यात आला असल्याचा शाओमीने दावा केला आहे.
शिओमीने असे स्पष्ट केले आहे की, विमान प्रवासा दरम्यान पॉवर बँक नेता येणार नाही.कारण त्याची बॅटरी मोठी असल्याने, या परिस्थितीत देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानात ही बॅटरी घेऊन जाण्याची परवानगी मिळणार नाही. पीडी 3.0 च्या मदतीने ही पॉवरबँक 24 वॅट चार्जिंगच्या पोर्टद्वारे 7.5 तासात पूर्णपणे चार्ज होते, असे शाओमी कंपनीने म्हटले आहे. या पॉवर बँकेमध्ये लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. MI बूस्ट प्रो पॉवरबँकची विक्री सध्याच्या घडीला क्राउडफंडिंगद्वारे केली जात आहे. सध्या ही पॉवरबँक फ़क़्त 1,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, परंतु, नंतर याची किंमत वाढून 3,499 रुपये पर्यंत होणार असल्याची शक्यता आहे.