28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeMaharashtra Newsमहाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन

संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत संचारबंदीची वेळ सध्या राज्यात सुरू करण्याचा विचार आहे आणि या वेळेचे बंधन सर्व दुकानं, हॉटेल आणि  बाजारपेठा सुरू ठेवणाऱ्यासाठी लागू असेल.

राज्यामध्ये वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा मिनी लॉकडाऊन करण्याचे संकेत मिळत आहेत. काल राज्यामध्ये एकाच दिवशी 43 हजारांच्या वरती नवीन कोरोना रुग्णची संख्या समोर आली आहे. वाढलेले कोरोनाचं प्रमाण बघून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची बैठक घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जनतेमध्ये पुन्हा होणार्या लॉकडाऊन बद्दलची धास्ती कायम आहे. मागील वर्षच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येने नविन उच्चांक गाठला आहे. एका महिन्यामध्ये जवळपास 6.6 लाखच्या दरम्यान कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याने तब्बल 400% वाढीची नोंद केली गेली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन करायचे कि नाही असा मोठा प्रश्न ठाकरे सरकारसमोर उभा राहिला आहे. मात्र लॉक डाऊन करण्यावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधातचं टिपण्णी केली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनबद्दल  पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊनचा विचार सध्या सरकार करत आहे. कशाप्रकारे असू शकते मिनी लॉकडाऊन, पाहूया थोडक्यात.

संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत संचारबंदीची वेळ सध्या राज्यात सुरू करण्याचा विचार आहे आणि या वेळेचे बंधन सर्व दुकानं, हॉटेल आणि  बाजारपेठा सुरू ठेवणाऱ्यासाठी लागू असेल. एकाच परिसरातील दुकाने एक दिवस एक आड सुरू ठेवण्याचा विचार विनिमय सुरु आहे. पहिल्या लॉकडाऊन मध्ये जसे एका गल्लीतील एका रांगेतील सर्व दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील दुकाने सुरू राहतील. जिथे गर्दी सर्वात जास्त होण्याची ठिकाणं जसे धार्मिक स्थळं, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स, मॉलस, थिएटर आणि पिकनिक पॉईंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. प्रशासन संकर्मणाचे केंद्र असलेल्या सर्व गर्दीच्या ठिकाणांवर कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.

सर्व खाजगी ऑफिसेसना कोरोनाची वाढती स्थिती पाहता काही काळासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय  अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयां मध्ये रोटेशन पद्धतीने अथवा कमीत कमी स्टाफ एकत्रित नसण्याच्या पर्यायाची चाचणी सुरु करण्यात येणार आहे. आणि ज्यामुळे कोरोन संक्रमण पुन्हा वेगाने वाढले आहे, असे म्हटले जाते ती मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन पुन्हा एकदा पूर्णत: बंद करण्याचा विचार सुरु आहे, परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतू, जसे आधी फक्त लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील लोकांनाचं परवानगी देण्यात आलेली त्याप्रमाणे आताही असावी, याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

इतर राज्यापेक्षा सर्वात जास्त कोरोनाची सापडलेली प्रकरणे आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा विस्फोट महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 43,183 नवीन रुग्णची नोंद केली गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्राझील, अमेरिका आणि  फ्रान्स या मोठ्या देशांमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त संक्रमित रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक प्रमाणात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा जगात चौथा क्रमांक आहे.  दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली असून, गुरुवारी मुंबईमध्ये एकूण 8,646 नवीन प्रकरणे आढळली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुण्यातील पिंपरी चिंचवड व पुण्याच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून, या बैठकीनंतर राज्यात कदाचित संपूर्ण लॉकडाऊन घेण्याबाबत घोषणा केली जाऊ शकतो

- Advertisment -

Most Popular