27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeEntertainmentBollywoodज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

भारत सरकारनं २००७ साली शशिकला यांच्या सिनेमातील अभूतपूर्व योगदानासाठी पद्मश्री किताबाने त्यांना गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डनेही त्यांना गौरवण्यात आले होते.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाल आहे. फिल्मफेअर अंकाचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खत बातमी शेअर केली आहे. ७० च्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका एकदम उत्कृष्टपणे निभावल्या होत्या. एकूण १०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म सोलापूरमध्ये ४ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. शशिकला यांच्या जिवनामध्ये अनेक चढ-उतार आले असले तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरामध्ये गेलं होतं. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला या मिळून एकूण सहा भावंडं त्यांना होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शशिकला या नृत्य, गायन व अभिनय करू लागल्या होत्या. वडिलांचे उद्योगामध्ये नुकसान झाल्यामुळं हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये स्थलांतरित  झालं. त्यावेळेस शशी जेमतेम ७ ते ८ वर्षांच्या होत्या. तिथं त्यांची ओळख नूरजहाँ सोबत झाली व त्यांच्यातील सुप्तगुणांना नूरजहाँ यांनी हेरले. त्यानंतर त्यांना नूरजहाँचे पती शौकत रिझवी यांच्या झीनत या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या जुगनू व अजून ३-४ चित्रपटामध्ये ४०० रुपये महिना मानधनावर शाशिकलांनी कामे केलीत. नंतर त्यांनी  निर्माते पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे लक्ष वेधून घेतलं.

shashikala

१९५३ साली शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्ता या चित्रपटात त्यांनी काम केलं. वयाच्या विसाव्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना २ मुली झाल्या. परंतु, शशिकला यांचे वैवाहिक जीवन काही चांगले नव्हते, ओमप्रकाश सैगल याच्याशी लग्न झाल्यानंतर सतत वाद आणि होणारऱ्या मारहाणीमुळे कंटाळून त्या परदेशी गेल्या. मात्र त्यानंतरही तिथेही त्यांना शांतता लाभली नाही तिकडून त्यात थेट कलकत्त्याला गेल्या आणि तिथे ९ वर्षे मदर तेरेसा यांची सेवा केली. त्यांच्या माध्यमातून त्या खऱ्या अर्थाने त्यांनी शांती अनुभवली.

shashikala death

त्यांच्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याबद्दल बोलायचं झाले तर, शशिकलाची संवाद फेकण्याची लकब व साजेसा अभिनय या गुणांमुळे तिच्या निगेटिव्ह भूमिकाही उठावदार बनवत असत. जंगली, हरियाली और रास्ता, अनपढ, तीन बहुरानियाँ, हमजोली, सरगम, क्रांती, यह रास्ते हैं प्यार के, नौ दो ग्यारह, कानुन, वक्त, देवर, अनुपमा, नीलकमल, रॉकी, बादशहा, कभी खुशी कभी गम, चोरी चोरी (२००३) इत्यादी अनेक चित्रपटामध्ये अगदी २००५ साला पर्यंत शशिकलानी कामे केलीत.

भारत सरकारनं २००७ साली शशिकला यांच्या सिनेमातील अभूतपूर्व योगदानासाठी पद्मश्री किताबाने त्यांना गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डनेही त्यांना गौरवण्यात आले होते.

- Advertisment -

Most Popular