24 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज

ईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज

ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा आणि सलमान खानची प्रमुख भूमिका असेलला ‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा प्रत्यके वर्षीप्रमाणे हा ईद स्पेशल चित्रपट आहे. सलमानचे चाहते त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. कोरोनाच्या या  संकटामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. लॉकडाऊन मुळे सर्व थिएटर, मॉल्स बंद असल्याने आणि ईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज करण्याचे चाहत्यांना शब्द दिल्याने आज हा चित्रपट रिलीज होत आहे. भारतात हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आणि एकदा पाहून झाल्यावर जर तुम्हाला दुसऱ्यांदा हा चित्रपट बघायचा असेल तरी पुन्हा तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई चित्रपट आखाती देशांसह इतर देशांमध्ये चित्रपट गृहांमध्येच प्रदर्शित केला जाणार आहे. प्रभुदेवा यानी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटामध्ये सलमान खान सह दिशा पाटनी, रणदीप हुडा, सिद्धार्थ जाधव, गौतम गुलाटी आणि जॅकी श्रॉफ यांनीही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहे. या चित्रपटात सलमानने एका कडक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून यामध्ये तो ड्रग माफियाचं अस्तित्व संपवण्याच्या पाठी लागलेला दिसत आहे.

radhe creating record

राधे  हा पूर्णपणे कमर्शियल सिनेमा पॅकेज असून, यामध्ये कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन आणि म्युझिकवर जास्तीत जास्त जोर दिलेला आहे. या सिनेमामध्ये सलमान खानचं नाव राधे असून, 2009 मध्ये सुपरहिट झालेल्या वॉण्टेड सिनेमातही त्याचं नाव राधे हेच होते. परंतु हा चित्रपट वॉण्टेड पेक्षा पूर्णत: वेगळाच आहे, असं सलमानचे मत आहे.

आज 14 मे रोजी देशभरात ईद साजरी होणार आहे. परंतु चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. दुपारी १२ वाजता चित्रपटाच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगला सुरुवात होणार असून, राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई  जगभरामध्ये जिथे कोरोनाचा प्रभाव कमी आहे तेथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. भारतामध्ये तो झी5, झीप्लेक्स आणि झी चॅनलवर पे पर व्ह्यू सुविधेनुसार पाहता येणार आहे. म्हणजेच या चनेल वर तुम्हाला जवळपास 249 रुपये खर्चून या चित्रपटाचा आनंद घ्यावा लागणार आहे. तसेच हा चित्रपट इतर डीटीएच ऑपरेटर्स जसे की टाटा स्काय,  डी2एच  आणि एअरटेल डिजिटल वरही पेड सर्व्हिसद्वारे पाहता येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांसाठी मल्टीपल ऑप्शनची सूट देण्यात आली आहे. प्रेक्षक त्यांच्या सोयीनुसार हा चित्रपट बघू  शकतात. चित्रपट पाहण्यासाठी युझर्सनी ZeePlex वर जाऊन ठराविक रक्कम भरावी आणि चित्रपटाचा आनंद घ्यावा. तसेच ओटीटी झी5 ने सांगितले आहे कि, जे प्रेक्षक झी सिनेप्लेक्सवर राधे: युवर मोस्ट वॉण्टेड भाई चित्रपट  पाहण्यासाठी निश्चित पैसे भरतील त्यांना वर्षभर झी5वर उपलब्ध असलेला कंटेट पाहता येणार आहे.

ईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज

कोरोनामुळे जशी इतर संकटे आहेत, तशीच संकटे चित्रपटाबद्दल सुद्धा आली आहेत. राधे – युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज असून, 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. सिनेमाचा टीझर, गाणी, लहान ट्रेलर सगळं लोकांसमोर थोड्या थोड्या दिवसाने येत आहे. आणि सल्लू भाईचा चित्रपट असल्याने हा सिनेमा सुपरहिट ठरणार हे सर्व चाहते गृहीतच धरून आहेत. अर्थात सिनेमाच्या रिलीज नंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतीलचं. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सलमान खानला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी सर्वात मोठी अडचण आहे ती थिएटर्सची.

राधे-युवर मोस्ट वाँटेड भाई हा सलमानचा चित्रपट झी प्लेक्ससह भारतातल्या अनेक थिएटरमध्ये एकाच वेळी ओटीटी आणि थिएटर  या दोन्ही स्तरांवर प्रदर्षित केला जाणार असल्याने थिएटर मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण असे चित्रपट थिएटरमध्ये लोकांना हमखास खेचून आनंरे असतात. अशा मोजक्या चित्रपटापैकी हा एक राधे असं मानलं गेलं आहे. परंतु या प्रकरणी सलमानने सर्व थिएटर मालकांची माफीही मागितली आहे.

- Advertisment -

Most Popular