28 C
Mumbai
Friday, July 26, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsदेशभरात रमजान ईद निर्बंधात साजरी

देशभरात रमजान ईद निर्बंधात साजरी

इस्लाममध्ये रमजान ईद हा खूप पवित्र दिवस मानला जातो. महिन्याभराच्या कडकडीत उपवासानंतर चंद्र दर्शन झाल्यावर रमजान ईद साजरी केली जाते. इस्लामिक कॅलेंडर मध्ये वर्षातून दोन वेळा ईद साजरी केली जाते. एक म्हणजे ईद उल फितर आणि दुसरी म्हणजे ईद उल अझा. प्रत्येक धर्मात सणांचे महत्व वेगळे असते. ईदच्या दिवशी सर्व मुस्लीम बांधव अल्लाहकडे त्यांच्या हातून काळात नकळत घडलेल्या पापाची क्षमा याचना करतात, तसेच आपल्या नातेवाइकांसाठी देखील अल्लाह जवळ विशेष नमाजच्या रुपात प्रार्थना अदा करतात.

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद उल फितरचा दिवस येतो जेव्हा संपूर्ण लोक संपूर्ण महिन्यात रमजानचे कडक उपवास म्हणजेच रोजे ठेवल्यानंतर अल्लाहकडे प्रार्थना करतात. इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या वर्षात ईद उल अझा जुल हज महिन्याच्या १० तारखेला साजरी करण्यात येते. या दिवशी हाजी हजरतचा हज संपतो आणि जगभरातील लोक घरातील आपल्या लहान मोठ्या माणसांच्या नावाने कुर्बानी देतात. आणि ती दिलेली कुर्बानी आपल्या काही नातेवाइकांमध्ये वाटतात.

eid mubarak

देशभरात आज अक्षय तृतीया आणि ईद सणाबद्दलचा उत्साह असला तरी कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर सगळेच सं साधेपणाने साजरे केले जात आहेत. मुस्लीम बांधवांमध्ये ईद या सणाला विशेष महत्व आहे. महिनाभराचे उपवास, दिवसातून ५ वेळा नमाजीचे पठण, संध्याकाळी उपवास सोडून, पुन्हा पहाटे ३ किंवा ४ वाजता उठून नमाज पढून रोजा धरणे, आणि या ३० दिवसांच्या प्रवासानंतर ईदीची खरेदी, तयारी, खाण्या पिण्याच्या पदार्थांची चंगळ, नातेवाईक, मित्र मैत्रिणीना  ईदच्या शुभेच्छा देणे हे खास असते. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील अनेक मशीद कमिटींनी यंदा ईदच्या मुहूर्तावर शासनाने आखून दिलेल्या कोरोना निर्बंधांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फतवा जारी करत म्हटले की, सध्याची कोरोनाची भयानक परिस्थिती पाहता मशीदमध्ये एकत्र येऊन नमाज अदा करणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी आपल्या घरी राहूनचं नमाज अदा करण्यात यावी. वर्षभर पोलिसही प्रत्येक सणासाठी गर्दी होणार नाही याकडे लक्ष देऊन कठोर पाऊले उचलत आहेत. दिल्लीतील जामा मशीद परिसरामध्ये दरवर्षी सामुहिक नमाज अदा केली जाते, परंतु या वर्षी पोलिसांची मोठी छावणीचं थेथे दाखल झाली असून, चारी बाजूने पोलिस कडक पहारा देत आहेत. मशीदीमध्ये इमाम आणि मोजक्या लोकांनांच नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे,  तर इतर मुस्लीम बांधवांनी घरी राहूनचं नमाज अदा करण्याचे अपील करण्यात येत आहे.

आज एकत्रित आलेल्या हिंदूंच्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया आणि मुस्लीम बांधवांची रमजान ईद याचाच संदेश देत आहे कि, देश सध्या कठीण काळातून चाललेला आहे, त्यामुळे एकत्रित राहून कोरोना संकटाला कायमचा नष्ट करूया.

- Advertisment -

Most Popular