अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) विविध कारणाने नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर आपल्या हातात घातलेल्या अंगठीचा फोटो पोस्ट केला होता. आताही ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या वाढदिवासाच्या दिवशी केलेला भन्नाट डान्स. आता तिचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत मलायका एकदम स्टनिंग ग्लॅमरस अंदाजात डान्स करताना दिसत आहे. ही व्हिडीओ तिच्या वाढदिवसाच्या वेळेला शूट केलेला असून त्यामध्ये ती आपल्याच धुंदीत नाचताना दिसत आहे. या व्हिडीओत मलायकाच्या डान्स स्टेपसोबतच तिचा वेगळा अंदाज आणि वेगळे फेशियल एक्सप्रेशनही पहायला मिळाले. हा व्हिडीओ जरी जुना असला तरी सध्या सोशल मीडियावर सगळ्यांची नजर मात्र मलाईकाच्या मदमस्त थिरकण्यावरच खिळली आहे. त्यावर मलायकाच्या चाहत्यांनी कमेन्टचा पाऊस पाडला आहे.
मलायका स्वत:ला फिट राखण्यासाठी व्यायामासोबतच योगा करते. ती सोशल मीडियामध्ये आपले योगा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते, तसेच आपल्या चाहत्यांनाही ती योगाच्या मदतीने फिट राहण्याचे आवाहन करते. मलायकाने काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. त्याचाही फोटो मलायकाने शेअर केला होता. त्यामुळे तिच्या वयाबद्दल पण अनेक शंका कुशंकांना चाहत्यांची चर्चा सुरु होती.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या रिलेशनशिपमध्ये असून, तूर्तास या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. बी टाऊनची सर्वात चर्चेत असणारी ही जोडी आहे. काही दिवसापूर्वी मलायकाने आपल्या हातात अंगठी घातल्याचा फोटो शेअर केला होता तर अर्जुन कपूरने आपल्या हातात मंगळसूत्र घेऊन फोटो शेअर केला होता. त्यावरुन त्या दोघांचा साखरपुडा किंवा लग्न झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. मलायकाने हा अंगठीसोबतचा फोटो शेअर केल्यावर तिची आणि अर्जुन कपूरसोबत एन्गेजमेंट झाल्याची बातमी चर्चेत असून चाहते त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र कालांतराने या अंगठीमागची खरी बाजू काहीतरी वेगळीच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तिने हा फोटो फक्त एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी पोस्ट केला होता. तिने स्वतः फोटोच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. एखाद्या स्वप्नासारखी ही अंगठी आहे. आणि ज्या व्यक्तीवर तुम्ही खरोखर प्रेम करता त्याला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी या अंगठीसारखा उत्तम पर्याय नाही, अशा आशयाचे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे. तसेच मलायकाने या अंगठीच्या ब्रँडला टॅग करताना पुढे लिहिले आहे की, साखरपुड्यासाठी येथे अनेक चांगल्या डिझाइन उपलब्ध असून तुम्ही तुम्हाला हव्या तशा डिझाईन प्रमाणे कस्टमाइजदेखील करुन घेऊ शकता. हे कॅप्शन बघता मलायका आणि अर्जुनचा अद्याप साखरपूडा झालेला नसून मलायका फक्त एका ब्रँडचे प्रोमोशन करत असल्याचे समोर आले आहे.