27.9 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsदेशात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयावर उपाययोजना

देशात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयावर उपाययोजना

केंद्र सरकारने कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी औषधं कंपन्यांना दिलेली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणाऱ्या 38.8 लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता 78 लाख पर्यंत होणार आहे. तसेच रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही काही प्रमाणात घट करण्याची तयारी खासगी औषधं कंपन्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे कोरोना संपविण्याच्या लढाईला एक प्रकारे मोठा हातभार लागणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा देशात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी खूप दगदग करावी लागत आहे. अनेक राज्यांकडून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याची तक्रारी नोंदविल्या जात आहेत. हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट करण्याच्या निर्णयाला फास्ट ट्रॅक परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक दिवस आधी मेडिकलमधून याच्या विक्रीवर निर्बंध आणण्यात आले होते. सरकारने सांगितलं आहे की फक्त हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमवर असलेल्या रुग्णांनाचं हे इंजेक्शन देण्यात येणार आहे, बाकी इतर कोणत्याही ठिकाणी या इंजेक्शनचा वापर केला जाणार नाही.   

shortage of remedicivir injection in india

रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट करण्याच्या या निर्णयाने मागणीप्रमाणे याचा पुरवठा करणे शक्य  होईल. त्यामुळे सध्या सर्व सामान्यांना न परवडणार्या महाग असलेल्या या इंजेक्शनची किंमत 3500 रुपयांपेक्षा कमी करण्याची तयारी बर्याच औषधं कंपन्यांनी दाखविली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत रेमडेसिवीरचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत होता. तसेच देशातल्या इतर भागातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थितीमध्ये जोपर्यंत सकारात्मक बदल घडलेला दिसत नाही तोपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. जी कोणतीही स्थानिक कंपनी रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करते त्यांना इंजेक्शनच्या उपलब्ध साठ्याविषयीची सर्व माहिती वेबसाईटवर दर्शवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून डिस्ट्रिब्युशन होत आहे याचीची माहिती कंपन्यांना सक्तीची केली जाणार आहे.

remedicivir injection in india

बंदी असणाऱ्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदी घेण्याबाबत चर्चा सुरु असून राज्यात असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आठवड्याभरात कमी करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं. तसंच केंद्राकडून 4 ते 5 राज्यांकडून ऑक्सिजन घेण्याची परवानगी मिळाल्याचं ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आज राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत FDA च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून, या बैठकीमध्ये सध्या राज्यातील परिस्थिती आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात रुग्णालयातील उपलब्ध बेडस, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा याबाबत देखील सर्व अधिकारी आणि शासकीय रुग्णालयात अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग होणार आहे.

- Advertisment -

Most Popular