30 C
Mumbai
Tuesday, December 3, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे

ईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे

सलमान खानचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. मागील वर्षीपासून वाट पाहत असलेला चित्रपट राधे चा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये सलमान आपल्या अनोख्या दिमाखदार अंदाजात मारामारी करताना दिसत आहे. मागील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार होता, परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्याच्या तारखा लांबणीवर पुडत गेल्या. बऱ्याच काळापासून प्रेक्षक वाट पाहत असलेला चित्रपट आता 13 मेला ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच चित्रपटगृहात सुद्धा प्रक्षेपित केला जाणार आहे. सोशल मीडियावरून सलमान खानने आपल्या राधे चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी राधे – युअर मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये सलमान राधे नावाच्या स्पेशल कॉपच्या म्हणजेच पोलिसांच्या भूमिकेत दिसला आहे. सलमानचे बरेचसे चित्रपट हे ईदच्या काळातच रिलीज होतात, यावेळीही त्याने चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार असल्याचे जाहीर करत दिलेला शब्द पाळला आहे. नियोजित तारखेनुसार चित्रपट येत्या 13 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. भारतासह ओव्हरसीजच्या चित्रपट गृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. या व्यतिरिक्त झी प्लेस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा राधे चित्रपट बघण्याचा आनंद घेता येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच नवीन पोस्टरदेखील रिव्हील करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत एक मराठी चित्रपटसृष्टी मधील आरारारा फेम लोकप्रिय अभिनेते तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील नजरेस पडत आहेत.

radhe-movie-release-date-on-Eid2021

सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘लवकरच येत आहे… तुमचा मोस्ट वाँटेड भाई’ असे कॅप्शन देऊन आपल्या नवीन मुव्ही राधे – युअर मोस्ट वाँटेड भाई  चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानसह दिशा पटणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, प्रवीण तरडे हे महत्त्वाच्या भूमिकेत चित्रपटात आहेत.  चित्रपटातील सलमान खानची स्पेशल कॉप राधेची भूमिका नक्कीच आकर्षक  असणार आहे. मुंबईमध्ये सर्हास खुलेआम सुरु असलेला अमली पदार्थांचा व्यापार आणि वाढलेले गुन्हेगारीच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची अशी एक वेगळीचं शैली आहे. राधेच्या ट्रेलरमध्ये सलमान वाँटेड चित्रपटामधील त्याचा  गाजलेला डायलॉग एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मे अपनी आपकी भी नहीं सुनता  म्हणताना दिसला आहे.

pravin tarde features in radhe movie poster

अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांच्या नाकी नऊ आणताना दिसतो आहे. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पटणी काम करत आहे. या चित्रपटाच्या मुख्य खलनायकाच्या भूमिकेत रणदीप हूडा आहे. गोविंद नामदेव आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये चित्रपटात आहेत. सलमान खानने काही दिवसांपूर्वी 13 मार्च ही प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तो म्हणाला होता,  ईद का कमिटमेंट था,  ईद पर ही आएंगे, क्योंकि एक बार जो मैंने..

- Advertisment -

Most Popular