26 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsनासाच्या इतिहासामध्ये भारतीयाचे वर्चस्व

नासाच्या इतिहासामध्ये भारतीयाचे वर्चस्व

सोमवारी पहिल्यांदा नासाने मंगळावर इंजेन्युटी हेलिकॉप्टर उडवून इतिहास घडवून आणला. जगभरातून नासाच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. आणि विशेष म्हणजे, मंगळावर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण करण्यामागे एका भारतीय वंशाच्या डॉ. जे. बॉब बालाराम या शास्त्रज्ञाचा तल्लख मेंदू कार्यरत आहे. ते नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये काम करतात. डॉ. बालाराम यांनी स्वत: इंजेन्युटी हेलिकॉप्टर तयार केलं आहे. ते मार्स हेलिकॉप्टर मिशनच्या मुख्य इंजिनीयर पदावर काम करत आहेत. या मोहिमेसाठी त्यांनी आपला 35 वर्षांचा अनुभव पणाला लावला आहे. बॉब बालाराम हे मूळचे दक्षिण भारतातील असून, त्यांनी न्यूयार्कच्या रेनसीलर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूटमधून कॉम्प्युटर ऍण्ड सिस्टम इंजिनीयरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Mars Helicopter

नासामधील हिंदुस्थानी वंशाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत ते दुसऱया स्थानी आहेत. मंगळावरती  हेलिकॉप्टर फक्त 30 सेकंदच का उडाले यावर बालाराम यांनी सांगितले कि, मंगळाच्या वायुमंडळात कोणतीही वस्तू उडवणे आणि ती पुन्हा पृष्ठभागावर उतरवणे खूप कठीण असते. कारण मंगळावरील वायुमंडळ एकदम हलके असून 30 सेकंदांच्या या उड्डाणासाठी माझा 35 वर्षांचा अनुभव आणि जगभरातील शास्त्रज्ञांचे ज्ञान पणाला लागले आहे.

नासाच्या दीड किलो वजनाच्या इंजेन्युटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर काही सेकंदांचे पण पहिलेचं यशस्वी उड्डाण करत इतिहास रचला आहे. उड्डाणावेळी लहान आकाराचे असलेले हे हेलिकॉप्टर १० फूट उंचीवर उडण्यात यशस्वी झाले आहे. एखाद्या हेलिकॉप्टरचे पृथ्वीबाहेरील दुसऱ्या ग्रहावर केलेले हे पहिलेचं उड्डाण होते. या यशाबद्दल नासा सायन्स मिशन डायरेक्टोरेटचे सहयोगी थॉमस जुरबुकेन यांनी संपून टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढे असेही सांगितले कि राइट ब्रदर्सनी घेतलेल्या पृथ्वीवरील पहिले उड्डानाच्या ११७ वर्षांनंतर नासाच्या इंजेन्युटी हेलिकॉप्टरने पृथ्वीपासून सुमारे २८.९३ कोटी किमी लांब एखाद्या दुसऱ्या ग्रहावर म्हणजेच मंगळ ग्रहावर यशस्वी उड्डाण केले. राइट ब्रदर्सनी उड्डाण घेउन नोंदविलेला विक्रम आणि इंजेन्युटी हेलिकॉप्टरने मंगळावरील उड्डाण दोन्ही नक्कीच अभिमानास्पद व अविस्मरणीय गोष्टी आहेत. मंगळावरील इंजेन्युटी उड्डाण व राइट ब्रदर्सचे उड्डाण आज एक झाले.

थॉमस यांनी हेलिकॉप्टर इंजेन्युटीच्या उड्डाणाला राइट ब्रदर्सचे नाव दिले आहे. नासानुसार पृथ्वीवर उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरचे ब्लेड एक मिनिटात ४००-५०० वेळा गोलगोल फिरते, तर मंगळावर पाठवलेले इंजेन्युटी हेलिकॉप्टरचे ब्लेड उड्डाणाच्या वेळी एका मिनिटामध्ये किमान २५०० फेऱ्या मारते. याचाच असा अर्थ होतो कि, इंजेन्युटी हेलिकॉप्टरचे ब्लेड पृथ्वीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या वेगाच्या तुलनेमध्ये चारपट वेगाने फिरले. नासाने इंजेन्युटी हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी त्याचे थेट प्रसारणही केले होते. नासाने या उड्डाणाआधी माध्यमांसमोर त्याच्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देखील दिली होती. नासाकडून प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नासा सायन्स मिशन डायरेक्टोरेटचे सहयोगी थॉमस जुरबुकेन, मार्स हेलिकॉप्टर प्रकल्प व्यवस्थापक मीमी आँग इंजेन्युटी हेलिकॉप्टरचे मुख्य अभियंता बॉब बलराम, जेपीएल संचालक मिशले वाॅटकिन्स उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular