23.9 C
Mumbai
Friday, December 27, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentदबंग सलमान खानने केले स्व:ताला क्वॉरंटाईन

दबंग सलमान खानने केले स्व:ताला क्वॉरंटाईन

सलमानचा ड्रायव्हर आणि इतर स्टाफ मेंबर्स ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सलमान खान आता १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहे, असं वृत्त पिंकव्हिलाने दिले आहे. अख्ख्या जग अजूनही कोरोना व्हायरसच्या विळख्यात असून जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अशातच भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, कोरोनाच्या विळख्यात अनेक बॉलिवूड कलाकार अडकले आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या कारणांमुळे चित्रपटाच्या चित्रिकरणांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रिकरणास परवानगी देण्यात आली. दरम्यान, कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. अशातच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसावरची लस लवकरात लवकर कोणता देश उपलब्ध करून देतो, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध नायक सलमान खान याच्या ड्रायव्हर सह दोन स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे. असं सांगण्यात येते आहे की, ड्रायव्हर अशोकची कोरोनाची चाचणी पोझीटीव आल्यानंतर अभिनेता सलमान खानने स्वतःला क्वॉरंटाईन केलं आहे. त्याचप्रमाणे, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी सांगितलं आहे. तसेच सलमानचा ड्रायव्हर आणि इतर स्टाफ मेंबर्स ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सलीम खान आणि सलमा खान यांच्या वेडिंग अॅनवर्सरीचं सेलिब्रेशनही या कारणास्तव रद्द करण्यात आलं आहे. सलमान खान बिग बॉस-१४ या शोचं सूत्रसंचलन करत असून, आता बिग बॉस सीजन १४ च्या एपिसोडसाठी सलमान सूत्रसंचलन स्वतः सलमान खान करणार कि काही कालावधीसाठी दुसर्याकडे सुपूर्द करणार ! यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याच प्रमाणे सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट राधेची शुटींग सुरु केली असून  या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पाटनी देखील दिसून येणार आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याने सरकारने सिनेमा आणि मालिका यांच्यावरील चित्रीकरणाला विशिष्ट नियमावली आखून देऊन परवानगी दिली आहे. त्यानुसार अनेक बॉलिवूड सिने कलाकरांनी गेल्या २ ते ३ महिन्यांमध्ये शुटींगला सुरुवात केली आहे. कोरोना काळात योग्य खबरदारी घेऊनच सर्व कलाकार काम करताना दिसत आहेत. मागील आठ महिने लांबणीवर पडलेले चित्रपटा अथवा मालिकांचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा चंग कलाकारानी बांधला आहे.

- Advertisment -

Most Popular