28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsसोशल मिडिया आणि फसवणूक..

सोशल मिडिया आणि फसवणूक..

फेसबुकच्या माध्यमातून दूर असणार्या जुन्या त्याचप्रमाणे नव्या लोकांशी ओळख होते. सुरुवातीला जुन्या किंवा सध्या संपर्कात नसलेल्या मित्र मैत्रिणीच्या संपर्कात येण्यासाठी सोशल साईटचा वापर केला जात असे, परंतु आत्ता फेसबुक सारख्या साईट चा वापर हा आर्थिक फसवणुकीसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या सोशल मिडिया आणि त्याद्वारे घडलेले फसवणुकीचे प्रकार जगजाहीर आहेत. प्रसिद्ध फेसबुक या सोशल मिडिया साईटवर बनवत नावाची अकाऊंट बनवून अनोळखी अथवा ओळखीच्या लोकाना फ्रेन्ड रिक़्वेस्ट पाठवून लोकांकडून पैश्याची मागणी करणे अशा विवीध प्रकारचे गुन्हे सोशल मिडीयावर घडत आहेत. आणि काही लॉक या प्रकाराला बळी सुद्धा पडताना दिसत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून दूर असणार्या जुन्या त्याचप्रमाणे नव्या लोकांशी ओळख होते. सुरुवातीला जुन्या किंवा सध्या संपर्कात नसलेल्या मित्र मैत्रिणीच्या संपर्कात येण्यासाठी सोशल साईटचा वापर केला जात असे, परंतु आत्ता फेसबुक सारख्या साईट चा वापर हा आर्थिक फसवणुकीसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून त्या व्यक्तीच्या फ्रेन्ड लिस्ट मधील लोकांना फ्रेन्ड रिक़्वेस्ट पाठवून त्यांना मेसेंजर वर संदेश पाठवून पैश्याची मागणी करणे आणि ते परस्पर स्वताच्या बँक अकाऊंटला ऑनलाईन ट्रान्स्फर करावयास सांगणे. सोशल मीडिया दिवसेंदिवस जितकं सक्रिय होत जात आहे,  तितकंच त्याच्यावर सायबर गुन्हेही सक्रिय होत चालले आहेत. आर्थिक फसवणुकीचे रोज नवीन काही ना काही पर्याय या सायबर गुन्हेगारांकडून शोधले जात असून याचा फटका मात्र सर्व सामान्य जनतेला बसत आहे. यापासून सावध राहण्याची अत्यंत गरज सध्या जाणवू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही ॲक्टिव्ह राहिलेत तरी मात्र अशा सायबर गुन्ह्यांपासून आपली फसवणूक होऊ नये यासाठी जास्त सतर्क असणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. फक्त थोडं सावध राहण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात न फसण्यासाठी काळजी कशी घ्यायची याबद्दल थोडक्यात बघू.

जर तुम्हाला अशा कोणत्या गुन्हेगाराची ओळखीच्या माणसाच्या नावाने फ्रेन्ड रिक़्वेस्ट आली तर लगेच न स्वीकारता त्या व्यक्तीशी संपर्क साधून पहावा. त्यामुळे जर ती व्यक्ती असेल अथवा नसेल तरीहि तुम्हाला आपोआप कळून जाईल. एखाद्यावेळी कोणत्याही मित्राने असे पैसे मागितले तर प्रथम त्याला फोन करुन खात्री करुन घ्या. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक गोष्टींबाबत कुठलीही माहिती अपलोड करु नका. आपल्या सोशल मीडिया अकाउटचे पासवर्ड नेहमी बदलत राहा. जर आपण सतर्क राहिलो तरच अशा सायबर गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना रोख लागू शकते आणि आपली फसवणूक होण्यापासून वाचू शकते.

- Advertisment -

Most Popular