आयपीएल सिझन १४ चा लिलाव झाला, परंतु तो सुरु होण्या पूर्वीपासूनचं सर्वांचं लक्ष सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर होतं. लिलाव साधारण पाच तासांपेक्षा जास्त वेळ चालला. या अर्जुन तेंडुलकरचं नाव सर्वात शेवटला घेण्यात आलं. साउथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी सगळ्यात जास्ती म्हणजे तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावली गेली. निव्वळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिससाठी १६.२५ कोटी मोजण्यात आले. आयपीएलच्या अख्ख्या इतिहासात लिलावात ही बोली लावलेली किंमत सर्वात मोठी आहे. राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपये मोजत आपल्या टीममध्ये स्वीकार केला. त्याचंवेळी मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. त्यामुळे आत्ता आपले वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यानंतर अर्जुनही मुंबई इंडियन्सचा सदस्य बनला आहे. अर्जुननं काही दिवसांपूर्वीच आयोजन केलेल्या ७३ व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ३१ बॉलमध्ये नाबाद ७७ रन्सची दमदार खेळी केली. आणि विशेषत: त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्या होत्या. त्यानंतर ४१ रन बनवून तीन विकेट्सही घेतल्या होत्या. अर्जुनच्या या सामन्याच्या कामगिरीवर एमआयजी क्रिकेट क्लबनं इस्लाम जिमखान्याचा १९४ रन्सने दारूण पराभव केला. त्याची ही दमदार कामगिरीच मुंबई इंडियन्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी नक्कीच निर्णयाक ठरली असणार.
मुंबई इंडियन्सनं निवड करताच अर्जुन तेंडुलकरनं त्याची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वांसमोर व्हिडीओद्वारे शेअर केली. वेगवान बॉलिंग आणि ऑल राऊंडर असलेल्या अर्जुननं या निवडीबद्दल मुंबई इंडियन्सचे टीम मॅनेजमेंट तसेच सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यावर व्यक्त होताना त्याचे सांगितले कि, तो लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा कट्टर फॅन आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल टीमचे कोच, मालक आणि सपोर्ट स्टाफचा मी खूप आभारी आहे. एमआय टीमची निळ्या आणि सोनेरी रंगाची जर्सी घालण्यापासून मी आता फार काळ थांबू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अर्जुननं दिली आहे. क्रिकेटचा देव संबोधल्या जाणार्या प्रसिद्ध फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्ये कायदेशीर रित्या एमआयकडून खेळताना दिसेल. चेन्नईमध्ये गुरुवारी पार पडलेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं त्याला २० लाखांच्या मुळ किंमतीत आपल्या टीममध्ये दाखल करून घेतलं. संपूर्ण पाच तासाच्या लिलावात सर्वात शेवटला अर्जुनचं नाव पुकारले गेलं आणि मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बॉली लावली. मुंबई इंडियन्सचं त्याला संघात घेतील, असा कयास सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. मुंबई इंडियन्सनं अर्जुनला संघात का समाविष्ट करून घेतलं, याबाबत संघाच्या कोर सदस्यांनी स्पष्ट केलं. मुंबई इंडियन्सचा ऑपरेशन प्रमुख झहीर खानने सांगितले, एका महान खेळाडूचा मुलगा आहे हे सत्य अर्जुन नाकारू शकत नाही, परंतु आत्ता त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे, ते त्याला करावे लागेल. नेट्समध्ये त्याच्या सोबत बराच वेळ मी खेळलो आहे आणि त्याला काही महत्वाच्या ट्रीक्सही शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तो अत्यंत मेहनती मुलगा असून नवीन शिकण्यासाठी तो कायम तयार असतो. प्रसिद्ध बाबा सचिन तेंडुलकरच्या नावामुळे त्याच्या वर प्रचंड दडपण असतं. टीम मधील महेला आणि शेन बाँड यांच्या मार्गदर्शनाखाली तो अजून चांगला तयार होईल. त्याला माझ्याकडून शुभेच्छा.
त्याचप्रमाणे आकाश अंबानी यांनीही अर्जुन बद्दल काही सांगितले आहे, ‘अर्जुनकडे कौशल्य आहे. जगात असे फार कमी क्रिकेटपटू असतात, त्यातील हा एक आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजही आहे. मुंबई इंडियन्स त्याला प्रगती करण्यासाठी नक्कीच सहकार्य करेल, अर्जुनलाही त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. अन्य युवा खेळाडूंप्रमाणेचं येत्या काळात अर्जुन स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण करु शकेल.
अर्जुन तेंडुलकरला एमआय संघात सामील केल्या नंतर त्यांची बहीण साराने सोशल मीडियावर भावाचं अभिनंदन करून तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर अर्जुन सोबतचा एक फोटो शेअर करून हे यश तुझ आहे, हे यश तुझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही, तुझा अभिमान आहे पोस्ट केली आहे.