HomeEntertainmentदिया मिर्झाचा झाला पुनःविवाह

दिया मिर्झाचा झाला पुनःविवाह

रहना है तेरे दिल मे फेम दिया मिर्झा तिच्या खासगी आयुष्यामध्ये एका नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरं गेल्यानंतर तिला हे सुख मिळणार आहे. दिया चा हा दुसरा विवाह असून तिने काही गोष्टीनी तो अभूतपूर्व बनविला आहे. यापूर्वी दियाने साहिल संघा याच्याशी २०१४ मध्ये विवाह केला होता. ५ वर्षांनंतर या दोघांनीही घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केली होती.

वैभव आणि दिया एकमेकांचे चांगले मित्र असून वैभव हा मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात वास्तव्याला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे दिया मिर्झा आपले होणारे पती वैभव रेखी यांच्यासोबत वांद्रे येथील घरी लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. दियाने रहना है तेरे दिल मे या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००२ सालापासून केली. या सिनेमाद्वारे तिने अनेकांच्या हृदयावर राज्य केलं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या याच अभिनेत्रीच्या आयुष्यात वैभवरुपी नवे वळण आलं असून, त्या वळणावरुनच ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. खासगी आयुष्यात विविध अडचणींचा सामना करणाऱी दिया आता पुन्हा एकदा विवाह करण्यास सज्ज झाली आहे. मुंबईतच दिया मिर्झाच्या वांद्रे येथील घर असलेल्या इमारत ‘बेलएयर’ च्या परिसरात असलेल्या एका गार्डनमध्ये हहा सोहळा हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विधीवत संपन्न झाला. सकाळपासूनच येथे पाहुण्या मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी ७ वाजताचा होता. विशेष म्हणजे वैभव रेखी यांचंही हे दुसरं लग्न आहे. पेशाने व्यावसायिक असणाऱ्या वैभव रेखी यांचं लग्न योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखी हीच्याशी झालेल. या दोघांना एक मुलगीही आहे. या लग्नासाठी वैभव रेखी यांची मुलगी हजर राहिलेली. काही वर्षांपूर्वी वैभव रेखी यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे ३९ वर्षांच्या दिया मिर्झानेही लग्नाच्या ५ वर्षांनी २०१९ साली पती साहिल संगा यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

dia mirza wedding

परंतु, दीया मिर्झाचे लग्न सध्या चर्चेत आहे ते तिने घेतलेल्या काही अभूतपूर्व निर्णयाने. बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया १५ फेब्रुवारी २०२१ ला विवाहबद्ध झाली. दीया आणि वैभव यां दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. विशेष म्हणजे दीयाच्या लग्नाचे सर्व विधी एका महिला पुजारीने केले होते. सोशल मिडीयावर दीयाने लग्नातील अनेक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याचप्रमाणे लग्नामध्ये मुलीचे केले जाणारे कन्यादान आणि बिदाई या दोनही पारंपरिक विधीसाठी फारकत घेतल्याचे कळले. हे विधी मुद्दामहून टाळण्यात आल्याचे तिने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच लग्नामध्ये केलेल्या सुंदर डेकोरेशनपासून ते वापरण्यात आलेल्या सामग्रीमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या वस्तू या इकोफ्रेंडली होत्या. मुख्यत्वे पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आल्याचे तीने सांगितले.

दियाने तिच्या विवाहाला महिला पुजारी म्हणून लाभलेल्या शीला अत्ता यांच्या विषयी देखील सांगितले आहे. तिची बालमैत्रीण अनन्याच्या  या महिला पुजारी शीला अत्ता नातेवाईक आहेत. कोणत्याही महिला पुजारीला  विधी करताना मी अनन्याच्या लग्नापर्यंत पाहिले नव्हते. अनन्यानेचं आमच्या लग्नात शीला अत्ता यांना लग्नविधी करण्यासाठी आणले. अनन्याकडून मिळालेली लग्नाची अतिशय मौल्यवान अशी ही भेट आहे. आपल्या आजुबाजूला होणाऱ्या बदलांची सुरुवात आपण केलेल्या निवडीपासूनच म्हणजे आपल्यापासूनच होते, आशा आहे कि, इतर जोडपी देखील नक्कीच याचे अनुकरण करतील.

- Advertisment -

Most Popular