28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleसर्वत्र वसंतपंचमी उत्साहात साजरी

सर्वत्र वसंतपंचमी उत्साहात साजरी

भारतामध्ये साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते, या काळात येणारा वसंत पंचमी हा सण आहे. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा असे म्हटले जाते. वसंत ऋतूच्या स्वागताचा हा विशेष दिवस आहे असे पुराणात म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये वसंत पंचमीला विठ्ठल-रखुमाईचं लग्न सोहळा दिमाखात साजरा केला जातो, परंतु या वर्षी काहीश्या साधेपणामध्ये पंढरपुरामध्ये वसंत पंचमीला हा देवाचा लग्न सोहळा साजरा झाला. पांढऱ्याशुभ्र पोषाखात विविधालंकारानी सजलेला विठोबा आणि देवी रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून लग्न लावले जाते. या काळात वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत विठ्ठलाला शुभ्र पोषाख धारण  करून गुलाल उधळण्याची प्रथा आहे. प्रत्येक ५ किलोमीटर वर प्रथा परंपरा निरनिराळ्या दिसून येतात. भारतात प्रत्येक सण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. खास करून या  दिवशी देवी सरस्वतीला अनन्य साधारण महत्व आहे. नृत्यकला शिकवणाऱ्या संस्थां मध्ये, विद्येची देवता देवी सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. निसर्गाला आलेला बहर पाहून वसंत पंचमीपासून वसंत ऋतूला सुरूवात झाली असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वसंत पंचमीचा आणि शेतीचा जवळचा संबंध दिसून आहे. या दिवशी नवान्न इष्टी नावाचा एक छोटा यज्ञ केला जातो. शेतात उगवीलेल्या, नवीन बहरलेल्या पिकाच्या लोंब्या घरात आणून पूजन करून त्या देवाला अर्पण करतात. म्हणून हादिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. राजस्थान, मथुरा, वृंदावन या भागातही या दिवशी विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्य, शंकर, गणपती आणि देव इंद्र यांची प्रार्थना केली जाते.

पुराण काळापासून ही प्रथा सुरु आहे. अगदी पेशव्यांच्या काळात सुद्धा हा उत्सव महाराष्टात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे. त्या दिवशी सर्व स्री-पुरुष भेट म्हणून आपल्या नातेवाइकांना, शेजार्याना फुलांचा किंवा शेतात उगविलेल्या हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांचा गुच्छ देत. डोक्यावरील फेट्यात तो कणसाचा तुरा रोवला जात असत. त्यादिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही प्रथा  होती. अजूनही काही प्रदेशांमध्ये पिवळी वस्त्र घालण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सण म्हटल्यावर फुले, फळे, मिठाई यांचीही एकमेकांकडे देवाणघेवाण केली जात असे. पेशव्यांच्या काळात केशरी रंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींना भोजनाला बोलवून त्यांचा सन्मान करण्यात येत असे. त्याचप्रमाणे या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान केले जाते. या वर्षी कुंभमेळ्याची योजना एप्रिल महिन्यामध्ये करण्याचे योजिले आहे. विविध भागाचा वेगळा इतिहास. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात देव नावाच्या गावामध्ये सूर्य मंदिरात असलेली देवतेची प्राचीन मूर्तीची स्थापन ही वसंत पंचमीच्या दिवशी केली असे समजले जाते. त्या दिवशी देवीला स्नान घालून आणि तिला नवी कोरी लाल वस्त्रे नेसवली जातात. भाविक मंडळी या दिवशी विविध प्रकारच्या संगीत अथवा  नृत्याचे सादरीकरण करतात.

पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळे कपडे घालून देवी सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाजवळ पुस्तके व लेखण्या ठेवून फुले वाहून देवीचा आशीर्वाद घेतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते. राजस्थानमध्ये सुद्धा पिवळा वेश परिधान करून, जेवणामध्ये  गोड पदार्थ करून, पिवळ्याचं रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा केला जातो. राजस्थानामध्ये मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूचा आरंभ म्हणून शीख संप्रदायामध्ये हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. महाराजा रणजीतसिंग यांनी गुरुद्वारामध्ये सार्वजनिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची प्रथा सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उडविण्याची प्रथा आहे. अशा प्रकारच्या  उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झालेली कळते. या दिवशी राजा-महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक विशेषता: पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत.

अगदी भारताप्रमाणे फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाब मध्ये सुद्धा वसंतपंचमी हा उत्सव पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. पंजाबमध्ये नदीकाठी शेतातील सरसों म्हणजे मोहरीची फुले बहरून पिवळी झाल्यावर हा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. या दिवशी गोड केशर घातलेला भात खाण्याची पद्धत आहे.

- Advertisment -

Most Popular