27 C
Mumbai
Saturday, September 7, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeIndia Newsस्वतंत्र भारतानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी

स्वतंत्र भारतानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी

स्वतंत्र भारतानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे. भारतात ही पहिलीच वेळ आहे एका गुन्हेगार महिलेला फाशीची शिक्षा देण्याची. शबनम असं या गुन्हेगार महिलेच नाव असून शबनमने २००८ साली प्रियकराच्या मदतीने कुटुंबातीळ ७ सदस्यांची हत्या केली होती. अमरोहा कोर्टाने केलेल्या सुनावणीवर शबनमने हायकोर्टात देखील दाद मागितली होती, परंतु सुप्रीम कोर्टानेही अमरोहा कोर्टाचा निर्णय कायम बाधित ठेवला. त्यानंतर शबनम आणि तिचा प्रियकर सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका प्रस्तुत केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी ही दया याचिका फेटाळून लावली. त्यामुळे शबनमची नोंद स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी देणारी पहिली गुन्हेगार महिला म्हणून केली जाणार आहे.

दीडशे वर्षापूर्वी मथुरामध्ये महिलांना फाशी देण्यासाठी फाशीघर बांधण्यात आले होते. परंतु अद्याप कोणालाही तेथे फाशी देण्यात आलेली नाही. शबनमच्या फाशीच्या निर्णयाबाबत मथुरा जेलचे अधीक्षक शैलेंद्रकुमार मैत्रेय म्हणाले की,  शबनमच्या फाशीची तारीख अजून निश्चित झालेली नाही. तसेच अद्याप याबाबत कोणताही आदेश वा सूचना जरी केलेली नाही. परंतु, जेल प्रशासनाने शबनमच्या फाशीची तयारी सुरू केली आहे. शबनमच्या गाबचे नाव बावनखेडी. १५ एप्रिल २००८ रोजी शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने रोजी आपल्याचं कुटुंबातील सात सदस्यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. यामध्ये तिचे आई वडील, दोन भाऊ, पुतण्या, वहिनी, मावस बहिणीचा समावेश होता. या घाणे बद्दल सांगताना बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, २००८ साली झालेल्या या भयानक घटनेनंतर अख्खा गाव आमच्यासकट हादरून गेला होता. त्यामुळे शबनमच्या या भयंकर गुन्ह्याची शिक्षा म्हणजे फाशी ही तिला लवकरात लवकर झालीच पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे. या घटनेचा एवढा धसका घेया गावातील लोकांनी घेतला कि, गावात बरीच लग्न झाली, मुले जन्माला आली परंतु २००८ सालानंतर गावातील कोणीही एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम असे ठेवले नाही.

प्रत्येक देशाचे कायदे, न्याय व्यवस्था वेगळी असते. भारताच्या कायद्यात प्रथमत: एका गुन्हेगार महिलेला फाशी देण्याची तरतूद केली गेली आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला तिने केलेल्या अक्षम्य गुन्हेगारी कृत्यासाठी फाशी देण्यात येणार आहे. यासाठी मथुरा कारागृहाने तयारीही सुरू केल्याचे वृत्त आहे. २००८ सालच्या एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनम नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच कुटुंबातील सात सदस्यांची कुऱ्हाडीच्या साहाय्याने वार करून निर्घृण हत्या केली. या भयंकर घटनेने अख्खा भारत हादरून गेला. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालय त्याचप्रमाणे हायकोर्टानेही गुन्ह्याचे स्वरूप पाहता महिलेची फाशीची शिक्षा कायम ठेवली. पोलीस अधीक्षकांनी फाशीची तारीख अजून नक्की नसून, मृत्यूचे वॉरंट निघाले कि, त्वरितचं शबनमला फाशी देण्यात येईल. दिल्ली मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणातल्या आरोपीना फाशी देणारा जल्लाद पवन याचीच  यासुद्धा फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नसली तरी शबनमला देण्यात येणाऱ्या फाशीघराची  पाहणी जल्लाद पवन यांनी दोनदा जाऊन केली आहे. त्यामध्ये असणाऱ्या काही त्रुटी सांगून त्यावर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. जल्लाद पवनला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही त्रुटी जाणवल्या , त्यावर तातडीने उपाययोजना केली जात आहे. त्याचप्रमाणे जेल प्रशासनाने बिहार मधील बक्सर मधून फाशीसाठी लागणारा दोरखंडही मागवला आहे. त्यामुळे अमरोहामध्ये राहणारया शबनमला २००८ मध्ये आपल्या प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील सात सदस्यांवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याच्या भयंकर गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून सरकारी आदेश आल्यावर शबनमला फासावर लटकवण्यात येईल.

- Advertisment -

Most Popular