27 C
Mumbai
Wednesday, December 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports Newsआयपीएल खेळाडुंचा लिलाव

आयपीएल खेळाडुंचा लिलाव

चेन्नईमध्ये आज आयपीएल खेळाडू निवडीचा लिलाव ठरणार आहे. आयपीएलच्या या लिलावासाठी एकूण १११४ खेळाडूंनी नावनोंदणी केली होती. त्या पैकी १६४ हे भारतीय आणि १२७ खेळाडू परदेशी आहेत. या खेळाडूंच्या नावाची लिलावा साठी छाननी केली गेली आहे. या लिलावात एकूण २९२ खेळाडूंवर लिलाव होणार आहे. त्यांच्यापैकी ६१ खेळाडूंची प्रथम निवड करण्यात येणार आहे. आपल्या टीममध्ये उत्कृष्ट खेळाडू असावा असा सर्वचं फ्रॅंचायजींना इच्छा असणार आहे. दरम्यान या ८ फ्रँचायजींकडे खेळाडूंच्या खरेदीसाठी काही विशिष्ट रक्कम ठरलेली आहे. तेवढ्याचं रक्कमेमध्ये त्यांना खेळाडूंना आपल्या टीममध्ये सामील करून घेता येऊ शकते. सर्व फ्रँचायजींनी ठराविक रक्कम खर्च करावी, याबाबत काही कायदे व नियम आहेत. या सर्व फ्रँचायजींना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण रक्कमेच्या ७५% रक्कम खर्च करने बंधनकारक असते. आणि जर नियमाप्रमाणे तसे न केल्यास संबंधित फ्रँचायजीकडे उपलब्ध असलेली रक्कम ताब्यात घेतली जाते. खेळाडूंचा लिलाव सुद्धा संघात असलेल्या आवश्यकतेनुसार ठरवला जातो. थोडक्यात पाहूया कोणत्या टीमला किती खेळाडूंची आवश्यकता आहे.

Auction of IPL 2021 players

मागील वर्षी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सकडे एकूण १८ खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये एकूण ४ परदेशी खेळाडू आहेत. म्हणजेच मुंबई इंडियन्सला या लिलावामधून एकूण ७ खेळाडूंची खरेदी करण्याची आवश्यकता लागणार आहे. मुंबई इंडियन्स त्यापैकी ४ परदेशी खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यास उत्सुक आहे.

टीम दिल्ली कॅपिटल्सला एकूण १७ खेळाडू उपलब्ध आहेत. त्यांच्या पैकी ५ आहेत ते परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला एकूण ३ खेळाडूंची आवश्यकता आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे असणारी एकूण रक्कम १३ कोटी ४ लाख इतकी आहे.

कोलकाता टीममध्ये एकूण १७ खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना आणखी ८ खेळाडूंची गरज भासणार आहे. त्या खेळाडूंपैकी २ खेळाडू परदेशी असणार आहेत. कोलकाताकडे असणारी एकूण रक्कम १० कोटी ७५ लाख इतकी आहे.

टीम बंगळुरुला दमदार खेळाडूंची आवश्यकता भासणार आहे. बंगळुरुकडे सद्य परिस्थितीत एकूण १४ खेळाडू उपलब्ध असून त्यांना आणखी ११ खेळाडूंची आवश्यकता आहे. त्यामध्ये ३ परदेशी खेळाडूंना खेळवणे नियमबद्ध आहे. बंगळुरुकडे असलेली एकूण रक्कम ३५ कोटी ४० लाख एवढी आहे.

किंग्ज्स इलेव्हन पंजाब टीमने नुकतेच आपल्या संघाचं नामकरण केले असून त्यांनी पंजाब किंग्स असे नाव ठेवलं आहे. तसेच टीमच्या लोगोमध्येही बदल करण्यात आला आहे. पंजाबकडे एकूण ३ परदेशीं खेळाडूंसह १६ खेळाडू आहेत. पंजाबला एकूण ९ खेळाडूंची आवश्यकता आहे. त्यांना ४ खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. पंजाब किंग्सकडे असलेली रक्कम ही इतर टीम पेक्षा सर्वात जास्त म्हणजेच ५३ कोटी २० लाख इतकी आहे.

टीम सनरायजर्स हैदराबादने गेल्या वर्षीच्या स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. सनरायजर्सकडे या हंगामात एकूण १० कोटी ७५ लाख इतकी रक्कम आहेत. व त्यांच्याकडील खेळाडूंची संख्या २२ आहे. टीममध्ये त्यांना अजून ३ खेळाडूंची गरज आहे.

मुंबई इंडियन्सच्या पाठोपाठ आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी टीम असेल तर ती चेन्नई. परंतु, आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नईला विशेष प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे या १४ व्या हंगामात दिमाखदार कामगिरी करण्याचा चंग चेन्नईने बांधला असण्याशी शक्यता नाकारता येत नाही.  सद्य स्थितीला चेन्नईकडे ७ परदेशी खेळाडूंसह एकूण १९ खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे टीम चेन्नईला आणखी ६ खेळाडूंची गरज भासणार आहे. चेन्नईकडे असलेली रक्कम ही १९ कोटी ९० लाख इतकी आहे.

राजस्थान रॉयल्स संधाची मालकी शिल्पा शेट्टीकडे आहे, टीममध्ये एकूण १६ खेळाडू आहेत. त्याप्रमाणे त्यांना ९ खेळाडूंची आवश्यकता आहे. त्यापैकी ३ खेळाडू परदेशी आहेत. राजस्थानकडे असलेली रक्कम ही १५ कोटी ३५ लाख एवढी आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या मोसमाला सुरुवात झाली असून आयपीएलमध्ये होणार्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -

Most Popular