29 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsफ्री ऑक्सिजन ऑन व्हील्स

फ्री ऑक्सिजन ऑन व्हील्स

भारतातील कोरोनाची चिंताजनक स्थिती पाहून जो तो आपापल्या परिने मदतीला पुढे सरसावत आहे. मग आनंद महिंद्रा यापासून कसे काय दूर राहतील ! गावोगावी जाणवणारी ऑक्सिजनची जाणवणारी समस्या लक्षात घेता, मंगळवारपासून महिंद्रा लॉजिस्टिकने ऑक्सिजन ऑन व्हील्स ही पूर्णपणे मोफत सेवा सुरू केली आहे. याद्वारे मोहिमेद्वारे गरज असणाऱ्या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादक आणि रुग्णालये तथा वैद्यकीय केंद्र जोडण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण,  मुंबई,  ठाणे,  नाशिक आणि नागपूर अशा शहरांमध्ये ही सेवा सद्य स्थितीला सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर महिंद्राने आता हा उपक्रम देशाची राजधानी दिल्लीमध्येही सुरु केला आहे.

कंपनीने ऑक्सिजन ऑन व्हील्स मोहिमे अंतर्गत ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा अधिक सुरक्षित तसेच वेगाने करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये एकूण 100 वाहने वितरीत केली आहेत. राज्यात रोज बोलेरो पिकअप ट्रकसह एकूण 600 ओ 2 सिलेंडर्स वितरीत करण्याचं काम वेगाने सुरु आहे. कंपनीने सांगितले आहे की, रोज आम्ही राजघाट आणि मायापुरी ऑक्सिजन डेपो मधून SOS ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा रूग्णालयासाठी वितरीत आहोत. आपला देश पुन्हा एकदा कोरोनाची नव्या लाटेमध्ये अडकला आहे आणि अशा संकटाच्या काळी आम्हाला योगदान देण्याची संधी आणि वारंवार दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,  येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीतील कामकाजबरोबरच आम्ही शेजारच्या काही केंद्रांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

महिंद्रा अँड महिंद्रा यांनी स्पष्ट केले कि, ही सेवा महिंद्रा लॉजिस्टिकच्या सीएसआर उपक्रमांतर्गत होत असून, या प्रोजेक्टसाठी प्रशासन आणि स्थानिक सरकारी संस्थांशी भागीदारी करण्यात आली आहे. तसेच कंपनीने पुढे म्हटले आहे कि, दिल्लीसह आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा ही ऑक्सिजन ऑन व्हील्स सेवा सुरू करण्याबाबत शहरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरु आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करणार्या सर्व राज्यामध्ये ही सेवा लवकरात लवकर सुरु करण्याचा कंपनीचा विचार सुरु आहे.

या कोरोना महामारीच्या संकट काळात महिंद्रा कंपनीने लोकांना मदत करण्यासाठी बोलेरो पिकअप ट्रकचा वापर केला आहे. ऑक्सिजन सिलेंडरचे वितरणही त्याच्या मदतीनेचं ही कंपनी करताना दिसत  आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या मोफत उपक्रमाला ऑक्सिजन ऑन व्हील्स असे नामकरण केले आहे. या उपक्रमाद्वारे नक्कीच गरजूंपर्यंत आणि ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयामध्ये वेगाने  ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले जात आहे.

- Advertisment -

Most Popular