सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर ३८९ रन्सची खेळी केली. टीम इंडियाने प्रत्युतर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा ३३८ रन्स पर्यंतच डाव आटोक्यात आला. दुसर्या वनडे सामान्या मध्येही ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या वनडे सामान्य प्रमाणेच प्रमाणेच भारतीय टीम विरोधात दमदार खेळी केली. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच जोडीने १४२ रन्सची दणदणीत सलामी दिली. फिंच ६० रन्स करून बाद झाला तर शतकाकडे कूच करणारा वॉर्नरची श्रेयस अय्यरने विकेट पाडली. त्याने ८३ रन्सची खेळी केली. स्मिथने कारकीर्दीतल्या शतकाची नोंद केली. त्याने १४ चौकार आणि २ षटकारांसह ६४ बॉलमध्ये १०४ रन्सची खेळी केली.
या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी क्रीकेट प्रेम व्यतिरिक्त कालचा सामना अजून एका प्रेम कहाणीमुळे चर्चेत आला आहे. एका भारतीय माणसाने भल्यामोठ्या स्टेडियममध्ये त्याच्या ऑस्ट्रेलियन प्रेमिकेला प्रपोज करत तिचा होकार मिळवला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोरोना कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जदरम्यान, २० व्या ओव्हर वेळी एका भारतीय माणसाने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रेमिकेला स्टेडियमध्ये प्रपोज केलं. भारतीय माणूस गुडघ्यावर बसला आणि त्याने प्रेमिकेला अंगठी सादर केली. अचानक मिळालेल्या आश्चर्यकारक धक्क्याने सावरून प्रेमिकेने प्रपोजालचा स्वीकार करत हो म्हटले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. चुंबनही घेतलं. जायंट स्क्रीनवर हे प्रपोजल दिसल्याने खेळाडूंनीही त्याला दाद दिली आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने टाळ्या वाजवून दोघांना शुभेच्छाही दिल्या.
ऑस्ट्रेलियाने ३८९ रन्सची दमदार खेळी करत टीम इंडियाला आव्हानच दिले होते. टीम इंडियासाठी शिखर धवन आणि मयांक अगरवाल यांनी ५८ रन्सची सलामी दिली. त्यानंतर मात्र दोघेही एका पाठोपाठ बाद झाले. त्या नंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव ब-यापैकी सावरला. त्यांनी ९३ रन्सची भागीदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने आणि राहुलने मिळून ७२ रन्स केले. परंतु ऑस्ट्रेलीयन क्रीकेट खेळाडू जोश हेझलवूडने कोहलीला बाद करत हि यशाकडे चाललेली भागीदारी मोडली. कोहलीने ८९ तर राहुलने ७६ रन्सची खेळी केली. राहुल आणि हार्दिक पंड्या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६३ रन्सची सांगड घालत विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली. पॅट कमिन्सने तीन तर हेझलवूड आणि झंपा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मात्र राहुल आणि हार्दिक बाद होताच ऑस्ट्रेलियाचा विजय काही प्रमाणात निश्चितच झाला.