26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsदहशतवाद्यांचा बोगदा बनवून घुसखोरीचा प्रयत्न

दहशतवाद्यांचा बोगदा बनवून घुसखोरीचा प्रयत्न

गुरुवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. पाच वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांना घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी थांबवून ड्रायव्हरकडे विचारपूस केली असता त्यानी तिथून पळून जायचा प्रयत्न केला. दह्शतवाद्यानी पोलिसांच्या पथकावर ट्रकच्या आतून गोळीबार करायला सुरुवात केली. मग प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जैश-ए-मोहम्मदचे ४ दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून ११ एके-47 रायफल आणि ३  पिस्तूल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. जम्मू काश्मीर मध्ये मोठा घातपात करण्याची योजना हे दहशतवादी आखत असल्याची शक्यता आहे. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा त्यांच्याकडे ट्रकमध्ये उपलब्ध होता. हे चौघे काश्मीरकडे जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविला आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत हे ४ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात लष्कराला यश मिळाले आहे.

सीमेवर असलेल्या तारांच्या कुंपणाशी कोणतीही छेडछाड केली गेली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी अजून एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बोगदा बनवून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांची हि पहिलीचं वेळ नाही. त्यामुळे हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनचं ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अजूनही शोधमोहीम सुरु आहे पण खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.

त्या नंतर अजून काही माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा आणि चीनचा मोठ्ठा संबंध असल्याचे समजते. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या सर्व विस्फोटकांवर मेड इन चायना असा शिक्का होता. त्याच प्रमाणे दहशतवाद्यांच्या हाता मध्ये चायना मेड हेंड ग्रेनेट होत्या. एवढ्या मोठया प्रमाणात ताब्यात घेण्यात आलेला शस्त्रसाठा बघून लष्कराला अचन्म्बित व्हायला झाले. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कसे काय शहरामध्ये आणला गेला? ज्या पदधतीचा हा कट निदर्शनास आला, पुलवामा हल्ल्याची पुन्हा आठवण झाली. तेंव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन दहशतवादी कसे घेऊन आले ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतचं आहे.

- Advertisment -

Most Popular