फेसबुक नंतर इन्स्टाग्राम हे सोशल मीडियामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. खासकरुन शहरी भागांमध्ये तरुण वर्ग इन्स्टावर खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यात भर म्हणून यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने तेव्हापासून इन्स्टा च्या युजर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बघायला मिळते आहे. इन्स्टाची वाढती लोकप्रियता पाहता कंपनीने ही त्याध्ये नवे फिचर्स लॉन्च केले आहेत.
इन्स्टा कंपनीने आपल्या ट्विटर प्रोफाइलवरुन हि माहिती दिली आहे की, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडीओमध्ये नवीन फिचर्स युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहेत. इन्स्टाग्राम लाईव्ह व्हिडीओ आता ४ तासांपर्यंत सुरु राहू शकणार आहे. याआधी इन्स्टाग्राम युजर्स एक तासापर्यंत लाइव्ह करु शकत होते, परंतु आता इन्स्टाग्राम लाइव्हसाठी टाईम लिमिट १ तासावरून वाढवून ४ तासांसाठी केला आहे. हा एक उत्तम पर्याय असून, ज्या व्यक्ती लाईव्ह सेशन करतात, त्यांना एक उत्तमचं टाईम पिरीयेड मिळाला आहे.
Some changes are coming to Instagram 👀
Today you’ll start seeing a Reels tab and a Shop tab on your home screen ✨https://t.co/6CKOiucokx pic.twitter.com/fdMOI8Dhya
— Instagram (@instagram) November 12, 2020
त्यानंतर दुसरा फिचरही लाईव्ह व्हिडीओच्या संदर्भातच आहे. इन्स्टाग्राम युजर्स आपल्या लाईव्ह व्हिडीओला काही दिवसांपर्यंत सेव्ह करुन ठेवू शकणार आहेत. इन्स्टा ने युजर्सना त्यांचा लाईव्ह व्हिडीओ डिलीट व्हायच्या आधी काही दिवसांपर्यंत सेव्ह करण्याचा ऑप्शन दिला आहे. जर हा व्हिडीओ तुम्ही एका महिन्याच्या आत सेव्ह केला नाही, तर हा व्हिडीओ आपोआप डिलीट होउ शकतो. तुम्ही हा व्हिडीओ एक महिन्याच्या आत IGTV मध्ये अपलोड करता येणाr आहे.
इन्स्टामध्ये एक्सप्लोर सेक्शनही जोडण्यात आला आहे. या शिवाय IGTV अॅपमध्ये एक नवीन फिचर लाईव्ह नाऊ देण्यात आले आहे. लाईव्ह नाऊ या सेक्शनमध्ये IGTV आणि व्हिडीओ फॉर यू यांसारख्या दुसऱ्या सेक्शनसोबत एक्सप्लोर पेजच्या टॉपवर देण्यात आलं आहे. एक्सप्लोर बटन आता नव्या मेसेंजर बटनच्या साईडला स्क्रिनच्या वरती उजव्या कोपर्यात आहे. इन्स्टाग्रामने दिलेल्या नवीन फीचर्सचा युजर्सना नक्कीच फायदा होऊन, युजर्स त्याचा चांगलाच फायदा करून घेतील. नवीन फीचर्समुळे इन्स्टाग्रामचे ग्राहकसंख्येत नक्कीच वाढ होणार आहे.