31 C
Mumbai
Sunday, November 10, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentकोरोनाचे संकट अजूनही टेलीव्हिजन सेट वर

कोरोनाचे संकट अजूनही टेलीव्हिजन सेट वर

२०२० सालची सुरुवात झाल्यापासूनचं कोरोनाचे महा संकट सर्वत्र आपण अनुभवत आहोत. मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणत वाढल्याने टेलीव्हिजन च्या मालिकांचे शुटींग या सारख्या गोष्टी पूर्णपणे थांबवण्यात आल्या होत्या. कारण एका शुटींग च्या दरम्यान साधारणपणे ३०० किंवा त्यापेक्षा ही जास्त माणसे एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे संसर्गाची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. टेलीव्हिजन वरील बर्याच मालिकांच्या सेटवर कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या थोड्या थोड्या काळाने येतच होत्या. मालिकांच्या चित्रीकरणामध्ये वेगवेगळ्या टीम असतात त्यामुळे त्या ठिकाणी संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त असते.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर सरकारने विशेष नियमावली आखून देऊन ४ महिन्यानंतर चित्रीकरणाला परवानगी दिली. परंतु विशेष काळजी घेऊनही कार्यक्रमाच्या सेटवर कोरोन रुग्णांची संख्या वाढतच आहे. हिंदी मालिकांच्या, रिअलिटी कार्यक्रमाच्या सेटवरही कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. एकीकडे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुबोध भावे, रोहित राऊत,अजित परब, अभिजीत केळकर, त्याचप्रमाणे सेटवरील काही इतर सदस्याना कोरोनाची लागण झालेली आहे. तर दुसरीकडे हिंदी मालिकांच्या सेटवरही कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या जगप्रसिध्द कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सुद्धा दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आहे. तर इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर सात लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर इतका वाढला आहे कि, चित्रिकरणाला अटींसह परवानगी दिली असली तरी संसर्गाचा धोका वाढतच आहे. रुग्णाच्या संख्येमध्ये घात न होता त्यात वाढ झालेलीच दिसत आहे.

सध्या कौन बनेगा करोडपतीचे चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सुरु आहे. तिथल्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आलेत. त्याचप्रमाणे इतर सदस्यांची काळजी म्हणून  संपूर्ण सेट त्वरित सॅनिटाईज करण्यात आला आहे. तसेच त्या दोन्ही सदस्यांनाही क्वारंटाईन कऱण्यात आलं असून ते नक्की कोण कोणच्या संपर्कात आले याचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे गीता कपूर, मलाईका अरोरा, टेरेंस लुईस यांच्या इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या सेटवर सात लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या डान्स शोमध्ये विविध ग्रुप सहभागी होत असतात. त्यामुळे सर्वच मालिकांच्या सेटवर जरा चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.  

- Advertisment -

Most Popular