Thursday, August 5, 2021
HomeMaharashtra Newsगुलाबापासून पिंक वाईन बनवण्यात पुण्याच्या जयश्री यादवांना यश

गुलाबापासून पिंक वाईन बनवण्यात पुण्याच्या जयश्री यादवांना यश

पूर्वी आपण रेड वाईन आणि व्हाईट वाईन हे प्रकार पहिले आहेत. आत्ता वाईन प्रेमींसाठी एक खुशखबर असून गुलाबाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेली वाईन असा एक नवीन प्रकार तयार करण्यात आला आहे. पुणे येथील जयश्री यादव यांनी गुलाबापासून वाईन बनविण्याचे पेटंट मिळविले आहे. गुलाबापासून वाईन कशी तयार केली जाते, त्याचप्रमाणे पिंक वाईन हि इतर वाईन पेक्षा कशी वेगळी आहे त्याबद्दल माहिती सांगितली. इतर बाजारामध्ये मिळणाऱ्या वाईन या द्राक्षांपासून तयार केलेली असते. म्हणजेच फळांपासून तयार असते. परंतु पिंक वाईन हि गुलाबाच्या देशी वाणापासून तयार केली जाते आणि लवकरच बाजारात पिंक वाईन उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

पुण्यातील जयश्री यादव यांनी सह्याद्रीच्या पायथ्यालगत गुलाबाची शेती केली आहे. गुलाबापासून आपण गुलाब जल, गुलकंद असे विविध प्रकार बनवत असतो. परंतु गुलाबापासून आपण वाईन का बनवू नये? याबाबत विचार सुरु असताना त्यांनी व त्यांच्या मुलीने मिळून त्यावर विविध प्रकारे संशोधन करून गुलाबापासून बनवली जाणारी पिंक वाईन चा शोध लावला. त्याचप्रमाणे त्याचे पेटंट मिळवण्यासाठी  मागील चार वर्षापासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांच्या मुलीने विशेष ट्रेनिंग देखील घेतले आहे. त्या बद्दल त्यांची मुलगी कश्मीरा हिने अजून माहिती दिली कि या प्रक्रियेसाठी साधारण २ ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. जशी रेड आणि व्हाईट वाईन तयार केली जाते त्याच पद्धतीने पिंक वाईन सुद्धा तयार केली जाते. फरक फक्त एवढाच कि पिंक वाईन हि फळांपासून तयार न करता गुलाबांच्या पाकळयांपासून तयार केली जाते. त्यामध्ये फुल तोडून त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून मग इतर वाईन प्रमाणे त्यावर प्रक्रिया करून गुलाबाची पिंक वाईन तयार केली जाते.  

भारतीय बाजारपेठेत हि वाईन येत्या सहा महिन्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. वाईन प्रेमींसाठी हि मोठी पर्वणीच ठरणार आहे. त्यांनासुद्धा एक विशेष प्रकारची नवीन चव चाखायला मिळणार आहे आणि या वाईन चे पेटंट मिळवण्यासाठी  त्यांनी त्यावर विविध प्रयोग करून खूप कष्ट घेतले असल्याचे पुण्याच्या उद्योजिका  जयश्री यादव म्हणाल्या. आणि प्रत्येक भारतीयासाठी हि फार अभिमानाची गोष्ट आहे कि फुलांपासून तयार होणारी वाईन आपल्या भारतीय बनावटीची आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments