BCCI च्या सूत्रांनी सांगितले कि, कोरोना महामारीच्या संकटामुळे इंडियन प्रीमियर लीग 2021 चे उर्वरित सामने मुंबईमध्ये खेळवले जाऊ शकतात, यासाठी मुंबईमध्ये सर्व सुविधाची तयारी केली जात आहे. सोमवारी KKR संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियरला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याचे लक्षात आल्यवर एकच गोंधळ उडाला. यामुळे काल होणारा RCB विरुद्ध KKR सामना देखील रद्द करण्यात आला.
BCCI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यातच IPL चे उर्वरित सामने मुंबईत शिफ्ट केले जाण्याची शक्यता आहे. सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा निर्णय झाल्यावर बंगळुरू आणि कोलकतासह अहमदाबादमध्ये होणाऱ्या प्लेऑफसह फायनलचा सामनाही मुंबईमध्येच होईल. याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. BCCI च्या या नियोजनानुसार 8 किंवा 9 मे पासून IPL चे सर्व सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये खेळवण्यात येऊ शकतात. मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील ही मोठी स्टेडियम उपलब्ध आहेत. आतापर्यंत या सीजनमधील 10 सामने वानखेडेमध्ये खेळवले गेले आहेत. इतर दोन स्टेडियमही सामन्यांसाठी तयार असल्याची माहिती आहे.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021
आयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणूने अखेर शिरकाव केलाच. खेळाडू कित्येक महिने बायो बबल मध्ये असून सुद्धा, तसेच दर दिवसानी होणारया कोरोना चाचण्या आणि प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगूनसुद्धा अखेर केकेआर च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झालीच. जग सर्व कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना, आणि सर्वात जास्त भयावह परिस्थिती भारतात असतानासुद्धा आयपीएल सामने मात्र दिवस रात्र सुरु होते. कोरोनाची स्थिती पाहता, खेळाडूंच्या मनात देखील स्वत:च्या प्राणाबद्दल भीती निर्माण होऊ लागली आहे. कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाल्याने ही त्यांची भीती सार्थ ठरली. सोमवारी हाती आलेल्या वृत्तामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द करावा लागला. तर, संघातील इतर खेळाडूंना त्यांच्यापासून लांब असे विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला आहे. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच, काही स्वदेशी तर काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत, आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्याचं बघायला मिळाले. देर आये दुरुस्त आये, ही उक्ती मान्य करून आणि आयपीएल वर कोरोनाचे घोंघावणारे संकट पाहून, आणि अधिकाधिक खेळाडूंना होऊ शकणारी कोरोनाची लागण पाहाता बीसीसीआयकडून ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.