25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsनिवडणुकांनंतर देशात इंधन वाढ

निवडणुकांनंतर देशात इंधन वाढ

देशात इंधनाची दरवाढ 66 दिवसांनंतर करण्यात आली आहे. झालेली दरवाढ ही पुढीलप्रमाणे असून, पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैसे प्रति लिटर महागले आहे. मधल्या काळात पश्चिम बंगालसह अन्य पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे इंधनाच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आला नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये या दोन महिन्याच्या कालावाधीमध्ये वाढ झाली असली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे होत्या, त्यामध्ये वाढ करण्यात नव्हती आली. सहाजिकच यामागे पाच राज्यातील विधानसभा निवडणुका हेचं कारण असल्याचे गृहीत धरण्यात आले होते. कारण जसा 2 मे ला निवडणुकाचा निकाल लागला, तसे लगेचच मंगळवार पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत थोड्या फरकाने वाढ झालेली दिसून आली. विधानसभा निवडणूक निकालनंतर अशी दरवाढ संभाव्य आहे, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे जी इंधन वाढीची भीती होती, ती भीती अखेर खरी ठरली, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे.

दररोज सकाळी 6 वाजता देशामध्ये परदेशातील कच्च्या मालाच्या किमतीवरून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. मधल्या काळात दर दोन दिवसाच्या फरकाने वाढणाऱ्या इंधन दर वाढीमुळे अनेक स्तरावर आंदोलने करण्यात आली होती. मात्र, नंतर पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. तेव्हापासून म्हणजे 27 फेब्रुवारीपासून इंधनाचे दर बदलले नव्हते. अगदी मार्च महिन्यामध्ये तर काही वेळा इंधन दर वाढीत कपातही करण्यात आली होती. कच्च्या खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्या इंधन दरामध्ये वाढ करणे अपेक्षित होते, परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती टाळण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकांमुळे दरवाढ केली जात नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. 2 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी इंधनाची दरवाढ करण्यात आली. त्यामुळे 66 दिवसांनी करण्यात आलेली दरवाढ ही तुलनेने अल्प दरवाढ असली तरी निवडणुकीच्या संदर्भाने त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच इंधन वाढीवर भाष्य केले होते. चार राज्यातील निवडणुका संपुन निकालही लागले. त्यामुळं देशातील आता पेट्रोल-डिझेलचे स्थिर असलेले दर पुन्हा एकदा वाढणार की काय आणि आधीच कोरोनाच्या संकटामुळे जनता आर्थिक रित्या होरपळली असताना, पुन्हा जनतेला आर्थिक रित्या महागाईच्या खड्ड्यात ढकलले जाते आहे,की काय असं वाटू लागलं आहे, असे पवार यांनी आधीच म्हटले होते.

कोणत्या ठिकाणी काय काय दर आहेत त्यावर एक नजर टाकूया. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ती 96.95 रुपये इतकी झाली असून शंभरी लवकरच गाठण्याची अंदाज वर्तवला जात आहे, तर डिझेलच्या आजच्या किंमतीमध्ये जराशी तफावत असून आजची किमत 87.98 रुपये झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची आजची किमत 90.55 रुपये एवधी झाली आहे, तर डिझेलची किमत  80.91 रुपये एवढी आहे. देशात इंधनाचे दर 15 जून 2017 पासून दररोज बदलण्यास सुरुवात झाली. देशात 27 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच स्थिर ठेवलेली इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे.

- Advertisment -

Most Popular