25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsबिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स होणार विभक्त

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स होणार विभक्त

अब्जाधीश असेलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा दोघांनी विवाहाच्या 27 वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा विभक्त होण्याचा निर्णय घेऊन तो सोशल मीडियाद्वारे सर्वाना सांगीतला आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी यासंदर्भातील एक संयुक्त वक्तव्य जाहीर केले आहे. 1987 मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा यांची पहिली भेट न्यूयॉर्कमध्ये एक्सपो-ट्रेड मेळाव्यामध्ये झाली. येथेच या दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली. त्यांनी सोशल मिडीयावर केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, एकत्रित केलेली मोठी चर्चा आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यावर खोल विचार केल्यानंतर आम्ही आमचा वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षामध्ये आम्ही एकत्रीतपणे तीन्ही मुलांचे पालन पोषण करून त्यांना मोठ केले आहे. तसेच आम्ही दोघे मिळून एक फाऊंडेशन सुद्धा चालवत आहोत, जे जगभरातील लोकांचे आरोग्य आणि चांगल्या जीवनासाठी कार्य करत आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अजूनही समान पातळीवर विचार ठेवून सोबत काम करू. मात्र आता आम्हाला वाटते आहे की, आम्ही जीवनातील भविष्यकाळामध्ये पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही. आम्ही नवीन आयुष्याची सुरूवात करत असल्याने, या प्रसंगी लोकांकडून फक्त आमच्या कुटुंबासाठी पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसीची अपेक्षा बाळगत आहे.

Bill Gates get divorse

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कार पार्किंगमध्ये त्यांना सोबत बाहेर फिरायला येण्याबाबत विचारले होते. तसेच बिल यांनी त्यांना डायरेक्ट विचारले होते की आतापासून दोन आठवडे, तु फ्री असशील का? परंतु मेलिंडाने त्यांच्या या प्रपोजलकडे दुर्लक्ष करून धुडकावून लावले होते आणि सांगितले होते कि, योग्य वेळ आल्यानंतर मला हा प्रश्न विचार. तरीही बिल गेट्स यांनी हार पत्करली नाही. हळुहळु दोघांमध्ये बोलणे वाढले. काही महिन्यानंतर, दोघांनी खरोखर नाते यशस्वी केले. 1993 सालामध्ये त्यांनी साखरपुडा आणि १९९४ सालच्या नव्या वर्षाच्या दिवशी अखेर दोघांनी लग्नगाठ बांधली.

जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये या दोघांची गणना केली जात असून, आयुष्याच्या या वळणावर अचानक विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फोर्ब्सने जाहीर केलेय 35 व्या यादीमध्ये बिल गेट्स यांच्याकडे सध्या अंदाजे 124 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून ते या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. बिल गेट्सनी 1970 च्या दशकात सुप्रसिद्ध कम्प्यूटर सॉफ्टवेयर कंपनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. या कंपनीमुळे संगणक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडलेच आणि बिल गेट्सना देखीळ भरपूर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली. इतिहासातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून  वयाच्या 31 व्या वर्षी बिल गेट्स यांच्या नावाची नोंद झाली होती. त्यांचा हा विक्रम 2008 पर्यंत कायम होता. वयाच्या 23 व्या वर्षी 2008 मध्ये बिल गेट्सचा हा रेकॉर्ड फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने मोडला. गेटस आपल्या आवडत्या झाडाची काळजी घेण्यापासून ते लक्झरी कारपर्यंत सर्व काही खर्च करतात परंतु त्यांचे मुख्य उद्दीष्ट गरजूंना मदत करण्यासाठी देणगी देणे हे आहे.

- Advertisment -

Most Popular