देशभरात कोरोना संसर्गामुळे बर्याच कालावधीपासून विमान सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये विमान वाहतूक कंपन्या आर्थिक नुकासानीमध्ये गेल्या. कोरोना रुग्ण संख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर अनेक बंधने घातली. यामुळे परदेशी वाहतूक बंद असल्या कारणाने अनेक विमान कंपन्यानी फक्त डोमेस्टीक विमान वाहतूक सेवा देण्यावर भर दिला आहे. यासाठी विशेषत: स्पाइसजेट या विमान वाहतूक सेवा कंपनीने मुंबई, नाशिक, पुणे, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नॉन स्टॉप विमान वाहतूक पुरवण्याची योजनेला सुरुवात केली आहे. या विमान सेवा २८ मार्चपासून पुणे, मुंबई नाशिक अशा मोठ्या शहरांमधून नॉनस्टॉप सुरु होणार असून, ग्वाल्हेर, जबलपूर दरभंगा, दूर्गापूर आणि वाराणसी या शहरांसाठी देखील डायरेक्ट पुण्यामधून नॉनस्टॉप विमानसेवा लवकरचं सुरु होणार असल्याचे ऐकिवात आहे. त्याचप्रमाणे राजकोट ते मुंबई आणि दिल्ली तसेच कोलकत्ता ते नाशिक अशी सरळ विमानसेवा सुरु करणार आहेत. स्पाइसजेट विमान कंपनीकडून, देशामधील अनेक मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमधील विमानसेवा वाढवण्यासाठी असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने या संदर्भातील सर्व माहिती ट्विट करून आणि एका निवेदनाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे. याकरिता कंपनी ६६ हून जास्त नवीन फ्लाईट्स सुरु करण्याची शक्यता आहे. या ठराविक मार्गाव्यातिरिक्त हळूहळू इतर मार्गावरदेखील अशी सेवा सुरु केली जाणार असून यासाठी कंपनी आणखी फ्लाईट्स सुरु करण्याचे नियोजन आखत आहे. परंतु, सध्यातरी फक्त ठरलेल्या मार्गाची योजनेला २८ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. आणि टप्प्याटप्प्याने कोरोनाची खबरदारी घेऊन इतर हवाई मार्गावरील सेवाही सुरु करण्यात येतील.
छोट्या शहरांमधील विमान सेवेसाठी असणारी वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने UDAN या योजने अंतर्गत ही सेवा सुरु केली आहे. स्पाइसजेटने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कि, या योजनेच्या सह्हायामुळे विमान प्रवाशांना दरभंगा, दुर्गापूर नाशिक आणि ग्वाल्हेरसारख्या लहान भागांना मेट्रो शहरांसोबत जोडणे सोप्पे जाणार आहे. त्याप्रमाणेच पुणे विमान वाहतूक सेवेद्वारे दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांना कनेक्ट होणारी स्पाइसजेट कंपनी ही पहिलीचं कंपनी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, नाशिक शहरावरुन दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरु या शहरांसाठी स्पाइसजेटने सेवा सुरू केली असून राजकोट ते मुंबई आणि दिल्ली तसेच कोलकत्ता ते नाशिक अशी डायरेक्ट विमानसेवा सुरु करण्याचा विचार आहे. तसेच कोलकाता शहरासाठीही आत्ता डायरेक्ट विमानसेवा सुरु करण्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणेकरांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी ठरणार आहे. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांना जोडण्यासाठी पुण्यामधून देशातील पाच शहरांमध्ये नॉन-स्टॉप विमानसेवा 28 मार्चपासून सुरु होणार आहे. स्पाइसजेट ही खासगी विमानसेवा कंपनी या सुविधा सुरु करत आहे. पुण्यातून दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दरभंगा, आणि वाराणसी या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. कंपनी किमान नवीन 66 फ्लाईट्स सुरु करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय काही विशेष मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे. एका निवेदनाद्वारे येत्या 28 मार्चपासून ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली. लहान मोठ्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठीचे हे एक टाकलेले पाऊल असल्याचे कंपनीने म्हटले आहे.