28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsपंतप्रधान नरेंद्र मोदींचा दांडी मार्चला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दांडी मार्चला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून पदयात्रेला सुरुवात करतील आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सव संबंधित अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्याचे योजिले आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संदर्भित अनेक सांस्कृतिक आणि डिजीटल कार्यक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील आणि साबरमती आश्रमात उपस्थित राहिलेल्या जनतेला संबोधित करतील. अमृत महोत्सवामध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण होणार्‍या उत्सवात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सांगतात की, असे शिकविण्यात आलेले की केवळ काही लोकांनीच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मदत केली,  परंतु इतिहासाच्या पुस्तकांमधून अनेक महान नेते वगळले गेले. राज्यात शहीद जवानांसाठी 30 हजारापेक्षा जास्त युद्ध स्मारके उभारण्याचा मानस आहे. कार्यक्रमात उपस्थित अनुपम खेर म्हणाले की, अशा लोकांचे आभार मानण्याचा दिवस आहे ज्याच्यामुळे आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. हे कायम लक्षात घेण्याची वेळ आहे की, मिळालेल्या स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नये, ते तयार करण्यासाठी लोकांनी आपला जीव अर्पण केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्ष उत्सवाची म्हणजे अमृत महोत्सवाची आजपासून सुरुवात होत आहे. देशभरात या उत्सवाचं सेलिब्रेशन करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. या अंतर्गत दांडी मार्चचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून सुरु होणार्या दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच प्रतिकात्मक रित्या दांडी यात्रे मध्येही पंतप्रधान मोदी दांडी पुलावरुन सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील उपस्थित राहणार आहेत.

अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या 75 ठिकाणी विविध समारंभ होणार असून भाजपच्या खासदारांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांमध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही केले होते. पुढील 75 आठवड्यासाठी काही कार्यक्रम तयार असल्याचं आणि काही कार्यक्रम लोकांच्या सल्ल्यानुसार या महोत्सवाच्या अंतर्गत करून घेतले जाणार आहेत.

संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव’ साजरा होणार आहे. यामध्ये सायकल आणि बाईक रॅली,  विविध कलात्मक स्पर्धा, एक भारत- श्रेष्ठ भारत आणि ‘आत्मानिर्भर भारत’ या विषयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मुले, तरुण-तरुणी आणि सर्व नागरिकांनी यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होणे हाचं केवळ अमृत महोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे आणि त्या बरोबरच महात्मा गांधींचा संदेश सर्वदूर पोहोचविणे हाही एक उद्देश आहे. आज ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती गांधी आश्रमातून झेंडा दाखवणार आहेत. साबरमती आश्रमापासून 386 कि.मी. अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी यात्रेमध्ये अंदाजे 81 पादचारी सामील होणार आहेत.

- Advertisment -

Most Popular