आयपीएल मध्ये मिळवलेल्या अदभूत यशानंतर मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच, क्रीकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या जाणार्या एकदिवशीय २०-२० आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा याला झालेल्या दुखापतीमुळे तो अनफिट असल्याचे कारण सांगून रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी त्यांची निवड केली गेली नाही. परंतु सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याचा समावेश न केल्यामुळे बीसीसीआयवर सर्व माध्यामांतून टीका करण्यात आली आहे. परंतु आत्ता हा वाद कुठेतरी थांबण्याचे संकेत दिसत आहेत. कारण ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी संघात रोहित शर्माचा समावेश करण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. बीसीसीआयला विविध माध्यमांमधून विचारणा करण्यात येत आहे की, जर रोहित शर्माने आय पी एल मध्ये सर्वोत्कृष्ट खेळी केली आहे तर मग तो ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवल्या जाणार्या एकदिवशीय २०-२० आणि कसोटी मालिकेसाठी अनफिट कसा ठरू शकतो? रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समावेश न केल्यामुळे बीसीसीआय वर चारही बाजूने टीकांचा मारा सहन करावा लगत आहे.
Happy Diwali to all. Lighten up with your loved ones. Stay safe and sound 😁 🪔 @ritssajdeh pic.twitter.com/oXwR3uQ3Yx
— Rohit Sharma (@ImRo45) November 14, 2020
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दि. 27 नोव्हेंबर पासून तीन सामन्यांमध्ये वनडे सीरीजसोबत होणार आहे भारतीय क्रीकेट संघाचे फिजियो नितिन पटेल हे व्यक्तिश: रोहित शर्माच्या दुखापतीवर लक्ष देणार असून त्याच्यावर होणार्या उपचार पद्धती बद्दल सुद्धा विशेष लक्ष देणार आहेत. कारण जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या सामन्यांना लागणार आहे. भारतीय संघ ३ २०-२० व ४ कसोटी सामने साधारणतः दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ खेळणार आहेत. अशातच अंदाज वर्तवण्यात येत आहे की, रोहित शर्माला झालेली दुखापत लक्षात घेता, आणि दुखापतीमधून तंदुरुस्त होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. २०-२० मालिकेमध्ये भारतीय संघात वापसी होऊ शकते, परंतु कदाचित वनडे सीरीजमध्ये वापसी होणार नाही.
या सामन्यांमध्ये केएल राहुलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि २०-२० सामन्यांसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. परंतु, रोहित शर्माची पुनरागमन झाल्या नंतर पुन्हा त्याला उपकर्णधार म्हणून निवडणार अथवा नाही याबाबत मात्र विचारविनिमय सुरु आहे.