33 C
Mumbai
Friday, June 9, 2023

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleआला हिंवाळा, तब्ब्येत सांभाळा !

आला हिंवाळा, तब्ब्येत सांभाळा !

शिशिर ऋतूचे आगमन आणि त्याबरोबर येणारे चांगले वाईट अनुभव आज आपण या सदरात बघणार आहोत. हिंवाळा म्हटला कि प्रथम सर्वाना आठवते ती गुलाबी आणि बोचरी थंडी. मकर संक्रमणानंतर हळू हळू थंडीची चाहुलं लागायला लागते. गुलाबी थंडीची मज्जा सर्वांनाच हवीशी वाटते पण त्या बरोबर येणारे आजार, दुखणी हि मात्र नकोशी वाटतात. हिंवाळा सुरु होण्याची चिन्ह दिसली कि वर्षभर कपाटामध्ये ठेवलेली स्वेटर, कानटोप्या, मोजे सर्व हळू हळू बाहेर येऊ लागतात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वानीच सर्व ऋतुंमध्ये विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हळुवार सुरुवात करून प्रचंड वाढणारा थंडीचा कडाका, अति शीत वार्यामुळे वातावरणामध्ये शुष्कपणा जाणवू लागतो. त्यामुळे या काळामध्ये आरोग्याशी निगडीत अनेक समस्या हिंवाळयामध्ये डोक वर काढतात. त्यातील काही समस्या आणि त्यावरील साधे सोप्पे उपाय आपण जाणून घेऊया.

हिंवाळ्यात साधरणत: दिवसा उष्ण आणि रात्री अति थंड वातावरण असते. त्यामुळे अशा वातावरणाचा त्वचेवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अति प्रमाणात थंडीमुळे त्वचा निस्तेज होऊन रखरखीत होते. त्वचा पांढरी पडणे, ओठ फुटणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, केस गळणे, पायांना भेगा पडणे, अशा अनेक आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे इतर ऋतूंप्रमाणे हिंवाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना एखादे चांगल्या प्रतीचे विंटर केअर लोशन लावूनच बाहेर पडावे. आंघोळी पूर्वी शरीराला तिळाच्या अथवा नारळाच्या तेलाने मसाज करून मग आंघोळ करावी. जेणेकरून शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन थंडीपासून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. हिंवाळ्यात शरीराचे संतुलन योग्य व्हावे यासाठी आहारात सुद्धा थोडा बदल करणे आवश्यक आहे. जसे कि हिंवाळ्यात हिरव्या भाजी, फळे बाजारात मोठ्या प्रमाणत विक्रीला येतात त्यामुळे त्या वातावरणाशी निगडीत अशी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्वचा तजेलदार राहण्यासाठी फळांचा रस, फळांचा गर, तूप इ. गोष्टींचा पण वापर उपयुक्त ठरू शकतो.

हिंवाळ्यात तळपायांना पडणारया भेगा एवढ्या प्रमाणात वाढतात कि त्या भेगांमधून रक्त येऊन त्यातून असह्य वेदना निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे तळपाय फुटण्याची चिन्हे दिसू लागली कि आधीच मोजे वापरणे, योग्य क्रीम लावणे या गोष्टी करणे सुरु केल्या पाहिजेत.  आहारात सुद्धा बदल करून साजूक तुपाचा जास्त वापर केला गेला पाहिजे.हिंवाळ्यात सर्व प्रकारची सांधे दुखी जास्त प्रमाणात जाणवते. सांध्यांना थंड हवा लागू नये म्हणून उबदार कपडे, हातमोजे, पायमोजे यांचा कायम वापर करावा. आहारात ताजे आणि सात्विक पदार्थांचेच सेवन करावे. अशा प्रकारे आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक ऋतूचा आस्वाद घ्यावा.

- Advertisment -

Most Popular