सुश्मिता सेन ही भारतीय अभिनेत्री आहे. ती आपल्या अभिनायासोबतच तिच्या फिटनेस मुळे प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे ती कायम विविध विषयांवर चर्चेत असते. सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला येऊन तिने स्वबळावर इथपर्यंत यशस्वी प्रवास केला आहे. दिनांक १९ नोव्हेंबर तिचा जन्मदिवस. तिने प्रामुख्याने हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी १९९४ मध्ये मिस युनिवर्स सौंदर्य स्पर्धेत सर्वात अव्वल मिस युनिवर्स हा किताब मिळवणारी हि पहिली भारतीय स्त्री ठरली आहे.
मिस युनिवर्स स्पर्धेत जाण्यासाठी त्याकाळी तिच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. त्यामुळे मिस युनिवर्स स्पर्धेचे कपडे सुद्धा तिने तिची आई आणि स्थानिक टेलरकडून शिवून घेतले होते. त्यानंतर १९९६ मध्ये ती दस्तक या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्या नंतरही तिने काही ठराविक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये सिर्फ तुम, बिवी नंबर १, आंखे, मै हू ना या चित्रपटांनी पडद्यावर तुफान कमाई केली. हिंदी भाषेप्रमाणे तिने तमिळ आणि बंगाली भाषेमध्येही सिनेमात काम केले आहे.
सुश्मिताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. त्यावेळी सर्वांनाच तिच्या या निर्णयाबाबत नवल वाटले. दोन मुलींची आई असलेल्या सुश्मिता सेन ने लग्न केले नसले तरीही गेले काही दिवस तिच्या आणि मॉडेल रोहमन शालच्या डेटची चर्चा आहे. लवकरच ती दोघ लग्न बंधनात अडकण्याची शक्यता आहे. मिस युनिवर्स स्पर्धेमध्ये सुश्मिताचा सामना ऐश्वर्या राय सोबत होती. दोघीन मध्येही अतित्तीची स्पर्धा होती. सुश्मिता सेनने मिस युनिवर्स हि स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली असे ऐकिवात आहे. या स्पर्धेत दोघीनाही एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती कोणती असेल? या प्रश्नाच्या उत्तराने सुश्मिता ऐश्वर्या पेक्षा वरचढ ठरली. त्यावर ऐश्वर्याने उत्तर दिले कि, मला माझी जन्माची तारीख बदलायला आवडेल. तर सुश्मिताने उत्तर दिले कि, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. या एका प्रश्नांच्या उत्तराने तिच्या भविष्याचा निर्णय केला होता. सुश्मिता एक चांगली कवयित्री पण आहे, ती स्वतः खूप चांगल्या कविता करते. सुश्मिता ने हिंदी माध्यमातून, सर्व शिक्षण पूर्ण केले.