HomeIndia Newsउत्तर भारत झाले बर्फाच्छादित

उत्तर भारत झाले बर्फाच्छादित

बर्फवृष्टी मुळे उत्तर भारतामध्ये थंडीची जणू लाटचं आली आहे. सगळीकडे बर्फचं बर्फ असल्याने पर्वत रांगांमधील परीसराचे सौंदर्य अजून खुलले आहे.

हळूहळू सुरु झालेली थंडीची सुरुवात वातावरण एकदम सुखदायक करते. परंतु काही ठिकाणी म्हणजेच उत्तर भारतामध्ये थंडीच्या सुरुवातीलाच पहिल्यांदी हिमवृष्टी झाल्याने एक प्रकारे आल्हाददायी वातावरण निर्माण तर झाले परंतु, जनजीवन विस्कळीत ही झाले आहे. सर्वत्र फक्त बर्फाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवर, घरांवर, झाडांवर, त्याचप्रमाणे अगदी गाड्यांवर सुद्धा बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टी मुळे उत्तर भारतामध्ये थंडीची जणू लाटचं आली आहे. सगळीकडे बर्फचं बर्फ असल्याने पर्वत रांगांमधील परीसराचे सौंदर्य अजून खुलले आहे. पर्यटक सुद्धा आकर्षिले जात आहेत. पर्यटक सुद्धा या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. उत्तर भारत म्हणजेच काश्मीर, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु होऊन बर्फवृष्टीमुळे परिसर बर्फाच्छादित झाला आहे. हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमाल्यामध्ये मोसमातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे.

रस्त्यांवर सर्वत्र बर्फ पसरल्यामुळे रस्ते वाहतूक बंद होऊन गावागावांमध्ये असणारा संपर्क सुद्धा तुटला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणत हिमवृष्टी झाल्याने पाणी आणि विजेची समस्या जाणवत आहे. तेथील स्थानिक लोकांना प्रत्येक हिमवृष्टीमुळे या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु तिथे गेलेल्या पर्यटकांसाठी बर्फवृष्टी म्हणजे पर्वणीच ठरली आहे. जागोजागी पर्यटक मनमुराद बर्फाचा आनंद लुटत आहेत. गुलमर्ग मध्ये पर्यटक आईस स्केटिंग चा आनंद लुटताना दिसत आहेत. शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा रेकॉर्ड मोडला आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच पार मायनस ३ अंशावर गेला आहे. आजुबाजुच्या परिसरामध्येही अति बर्फवृष्टीमुळे गावांमध्ये वीज आणि पाण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. रस्ते बंद असल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून शाळा कॉलेजना सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे. तर काही भागात बर्फाबरोबरच पाऊसही भरपूर प्रमाणत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी बर्फवृष्टीने काश्मीरमध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काश्मीर दौरा केला. काश्मीर बरोबर राज्यातल्या पिकांच्या नुकसानाकडे राज्यपालाचं लक्ष नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र आणि काश्मीरमधल्या नुकसान झाले आहे, शेती पूर्ण बर्फाखाली झाकली गेली आहे. या नुकसानीची माहिती राष्ट्रपतींना सांगण्यासाठी त्यांची वेळ मागीतली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular