व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15 मे पूर्वी व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा जर स्वीकार केला नाही तर भविष्यामध्ये व्हॉट्सअॅप वापरण्यास समस्या निर्माण होऊ शकते किंवा व्हॉट्सअॅप अकाउंट बंदही होऊ शकत. कंपनीने जानेवारी 2021 सालामध्ये आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले होते. परंतु, या पॉलिसी अंतर्गत ग्राहकांसाठी नवे नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. या पॉलिसीमध्ये ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. 8 फेब्रुवारी पासून व्हॉट्सअॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार होती, परंतु त्यावरून निर्माण झालेल्या वादावरून त्या तारखेमध्ये वाढ करुन ती 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक वादांनंतर, तसंच ग्राहकांमधील गोंधळाने ही प्रायव्हसी पॉलिसी तीन महिन्यांसाठी स्थगीत करण्यात आली होती.
15 मे रोजी व्हॉट्सअॅप नवी प्रायवसी पॉलिसी लागू करणार असून, जर एखाद्या युजरने त्या कालावधीमध्ये व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर 15 मेनंतर व्हॉट्सअॅप संदर्भात कोणतेही अपडेट मिळणार नाहीत, कोणताही मेसेज पाठवू अथवा मेसेज मिळणारही नाहीत. जर ग्राहकांना व्हॉट्सअॅप बंद करायचे असेळ तर 15 मे पूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री बककप करून घेऊ शकतात. मात्र अॅक्टिव्ह नसणाऱ्या अकाउंट्सची 120 दिवसांनंतर सर्व चॅट रेकॉर्ड, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व आपोआप डिलीट होईल.
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायवसी पॉलिसीबाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. नव्या पॉलिसीबाबत ग्राहकांमध्ये शंकेचे वादळ उठलेले आणि पसरलेल्या अफवांमुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, जर व्हॉट्सअॅप सुरु ठेवायचे असेल तर, व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी आहे त्या स्वरूपामध्ये सर्व युजर्सना मान्य करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी व्हॉट्सअॅपला इतर पर्यायही शोधण्यात आले आहेत. मात्र व्हॉट्सअॅपने याचं पसरलेल्या अफवांबद्दल खंडन करून, प्रायव्हेट चॅट कुठेही इतरत्र शेअर होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण चॅट हिस्ट्री ही एंड टू एंड एन्क्रिप्शन ने प्रोटेक्टेड असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही युजरचा पर्सनल चॅट अथवा काहीही माहिती इतर कोणीही अॅक्सेस करू शकत नसल्याचा दावा व्हॉट्सअॅपने केला आहे. तसंच प्रत्येक चॅटमध्ये व्हॉट्सअॅप एंड टू एंड एन्क्रिप्शन चं लेबल देतं, जेणेकरुन युजर्सला त्यांचं चॅट सुरक्षित असल्याचं समजेल.