27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeEntertainmentसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा

सूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा

कलर्स मराठी टिव्हीच्या सूर नवा ध्यास नवा  या महिलां पर्वाच्या गीतगायन स्पर्धेचे गोव्यातील रविंद्रभवनमध्ये चित्रिकरण सुरु आहे. काल फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी रवीन्द्र भवनला भेट देऊन प्रत्यक्ष सुरु असलेल्या चित्रिकरणासाठी उभारलेल्या सेटची पाहणी केली असता, ज्या प्रकारे निष्काळजीपणे हे शुटींग सुरु आहे त्यावर नाराजगी व्यक्त करत सरदेसाई यांनी विरोध दर्शविला. येथे कोविड निर्बंधित नियमांचा भंग झालेला दिसत असून, येथे कुठल्याही मार्गदर्शक तत्वांचे पालन होताना दिसत नाही आहे. तसेच यामध्ये एकही गोमंतकीय कलाकार नाही, त्यांना कोकणी भाषाही कळत नाही. या चित्रिकरणाचा कुणालाही फायदा असून निव्वळ ज्यानी या चित्रिकरणास मान्यता दिली आहे त्यानाच केवळ याचा फायदा होणार आहे.

येथे सुरु असेलेले चित्रिकरण म्हणजे एक प्रकारचे रॅकेट असल्याची टिका सरदेसाई यांनी केली आहे. केवळ या निष्काळजीपणाने केल्या जात असलेल्या चित्रिकरणामुळेच फातोर्डा कोविडचा हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरातील कोविड रुग्णाच्या वाढीला केवळ या चित्रिकरणला दिलेली परवानगीच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. तसेच रवीन्द्र भवनची या चित्रिकरणामुळे नुकसान झाले आहे. त्याची जबाबदारी कोण घेईल व दुरुस्ती कोण करेल असे प्रश्र्नही सरदेसाई यांनी उपस्थित केले आहेत. सरकार एका बाजुने कडक निर्बंध लागु करत आहे तर दुसऱ्या बाजुने अशा प्रकारचे उद्योग सुरु ठेवल्याची टिकाही सरदेसाई यांनी केली.

जर हे चित्रिकरण असेच चालु राहिले तर त्याचा कडकपणे विरोध केला जाईल असेही सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाचे निर्माते अवधुत गुप्ते यांनी सांगितले की, सर्व नियमांचे पालन करुनच हे चित्रिकरण सुरु आहे. शिवाय सर्व परवाने आमच्याकडे आहेत. गोवा व महाराष्ट्र यांचे सांस्कृतिक दृढ संबंध आहेत त्यामुळेच आम्ही चित्रिकरणासाठी गोव्याची निवड केल्याचेही ते म्हणाले. फातोर्ड्यात जो कोरोना पसरला आहे तो या शुटिंगमुळे नाही, तर मागच्या आठवड्यामध्ये तेथे नगर पालिका निवडणूका झाल्या त्यात सरदेसाईंनी पण कॅम्पिग केलं होतं त्यामुळे तेथे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. जे शुटिंग करणारे कलाकार आहेत ते बायो बबल मध्ये असून ते कुठेही बाहेर जात नाही. रविंद्रभवन मध्येच राहून शुटींग करतात. डायरेक्ट सेट वर जावून अशी गुंडगिरी केल्याने गोव्याची प्रतिमा मलीन करण्याच काम सरदेसाईंनी केलं आहे, असे मत भाजप पक्षाचे नेते दामु नाईक यांनी व्यक्त केले आहे.

देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर निर्बंधित लॉकडाऊनचे निर्णय घेतले आहेत तर काही भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी न करता निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. गोव्यातही सध्या असे चित्र पहावयास मिळत आहे. गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आर्थिक व्यवस्थेवर डळमळीत न होण्यासाठी कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढत जाणारा आकडा पाहत असताना देखील इथं अद्याप सर्व साधारण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु, निर्बंध आणखी कडक करत प्रवाशांची ये-जा आणि अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण इथं सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular