26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleकोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के

कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के

कोरोनाचे संक्रमण सर्वत्र वेगाने पसरत आहे. या संक्रमणाचा परिणाम संपूर्ण शरीरावर झालेला दिसून येतो आहे. हे आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर आघात करून मुख्य करून फुफ्फुसांना कमकुवत करत आहे. यामुळेचं जी कोरोनाची स्वाभाविक लक्षणे आहे, जसे श्वास घेण्यास त्रास होणे आणि जीव वाचवण्यासाठी आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत, संयम राखून नैसर्गिक गोष्टीचा अवलंब नियमितपणे केल्यास आपण घरच्या घरी शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे ठेवू शकतो आणि शरीरातील ऑक्सिजन लेवल देखील योग्य राहू शकते. आयुर्वेदामध्ये रासायनिक पदार्थाचे अनन्य साधारण महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. अगदी आपल्या रोजच्या जिन्नसातील पदार्थ  त्यामध्ये आले, हळद, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, पिंपळ, तुती, हिरवी फळे येणारे एक झाड जाम इत्यादींबद्दल उपयुक्त माहिती नमूद केली आहे.

कोरोनाच्या अशा गंभीर परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टींचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि खनिज, जीवनसत्व पूर्ण करण्यासाठी पालक, बीटरूटचा जेवणामध्ये वापर करू शकता. या सर्व गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे आणि पोषक द्रव्ये आढळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची शाकाहारी, मांसाहारी सूप सेवनाने सुद्धा अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढल्याचे समोर आले आहे, त्यामुळे शरीरास भरपूर प्रमाणात लोह, खनिज आणि जीवनसत्त्वे प्राप्त होतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढत असताना, शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढण्यास मदत होते व कृत्रिम ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता भासत नाही.

Natural immunity booster kadha for corona

देशातला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढवतचं आहे. अशातच कोरोनाशी लढण्यासाठी रुग्णांमध्ये उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणे गरजेचे असते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे गरजेचे आहे. शरीरात प्रथिनं आणि फायबर योग्य प्रमाणात वाढविण्याकरिता आपल्याला योग्य प्रमाणात फायबर आणि प्रथिनंयुक्त आहार घेणे अत्यावश्यक असते.

हल्ली सगळीकडे कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक उपायांचे मेसेज व्हायरल होताना दिसतात, आयुर्वेदाचा अपाय कोणताच नसतो परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरातीलच काही जिन्नस वापरून घरगुती काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, COVID-19 पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर, सर्वात आधी शासनाने आखून दिलेले सर्व कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular