योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने २३ जून रोजी कोरोना संक्रमण रोखण्यावरील औषधं कोरोनील लॉन्च केले. या औषधाची काही कोरोना रुग्णावर ट्रायल घेतल्यानंतरचं बाजारात औषधं लॉन्च केल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु, यावर वाद निर्माण झाल्यानंतर मात्र आयुष मंत्रालयाकडून ५ तासामध्येच या औषधाच्या प्रचारास बंदी घालण्यात आली. तूर्तास केंद्रीय आयुष मंत्रालयानं कोरोनिल औषधाची जाहीरात करणे थांबवण्याचे आदेश जारी केले. जोपर्यंत या औषधाबद्दल नीट तपासणी होऊन रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत याची जाहीरात थांबवण्यात यावी असे आदेश देण्यात आले. हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामदेव बाबांनी हे औषध लॉन्च केले. त्यावेळी या औषधाची चाचणी मेडिकल प्रमाणित असल्याचाही त्यांनी दावा केला. पण नेमक्या या औषधाला कोणी प्रमाणित केलं आहे, याबाबत मात्र गह्जब उडाला. कारण इंडियन मेडिकल कौन्सिलनं यांनी आधीच या गोष्टीचा नकार दिला होता. आणि ज्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय येतो त्यांनी त्याबाबत पतंजलीकडूनचं स्पष्टीकरण मागवलं. त्याचप्रमाणे त्या औषधाची आणि त्यामध्ये वापरल्या गेलेल्या प्रमाणांची सर्व चाचपणी करण्यासाठी पतंजलीला नोटीस धाडण्यात आली. आणि मुख्य म्हणजे उत्तराखंड सरकारच्याच प्रमाणपत्रावर हे औषध तयार झाल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे या उत्तराखंड सरकारनं नेमकी कुठली लायसन्स या औषधाला दिली आहे, याबाबतच्या सर्व कागदपत्रांची माहिती आयुष मंत्रालयानं मागवून घेतली आहे. काही दिवसानंतर बाबा रामदेव पुन्हा मिडिया समोर आले आणि कोरोनिल वरील बंदी उठवण्यात आली असल्याची माहिती दिली.
आज शिवजयंतीचे औचित्य साधून योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनाचे औषध लॉन्च केले. त्यांचा दावा आहे की, हे औषध जागतिक आरोग्य संघटनेने सर्टिफाइड असून त्यावर काहीही शंका घेऊ नये, त्याचे आवश्यक मेडीकल ट्रायल देखील झाले आहेत. या औषध लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रस्तेविकास मंत्री नितिन गडकरी उपस्थित दिसले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपरही सर्वांसमोर सादर केले. यावेळी योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आमची इच्छा आहे की, योग आयुर्वेदच्या रिसर्च बेस्ड मेडिसिनद्वारे आपला देश मेडिकल क्षेत्रात संपूर्ण जगाला उंचीवर न्यावा. यामुळेच या औषधाच्या लॉन्चिंग साठी हा महान दिवस निवडला गेला आहे. याबाबत अनेक रिसर्च पेपर सादर झाले आहेत. कोरोनील लॉन्च केल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आयुर्वेदात रिसर्च केल्यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. आम्ही लॉन्च केलेला रिसर्च पेपर कोरोना विषाणूच्या पहिल्या प्रमाणित औषधाशी संबंधित आहे. पतंजली आयुर्वेदने ट्विट करुन म्हटलं आहे कि, आमच्या साठी नक्कीच हा गर्वाचा क्षण आहे; पतंजली कंपनीद्वारे कोव्हिड-१९ करिता पहिलं प्रमाणित औषध लॉन्च करताना आम्हाला साहजिकच विशेष आनंद होतो आहे”, तसेच आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समसमान पातळीवर एकत्रित रित्या पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल हे कोरोनावरील औषधं कोट्यवधी लोकांना जीवनदान देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष सफर करून आम्ही लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात यश मिळविले आहे, असं पतंजलीने म्हटलं आहे.
भारतातील अजून २ अग्रगण्य कंपन्या म्हणजेच हैदराबादमधील स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन लस विकसित केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिड-19 प्रतीबंधात्मक लस तयार केली. देशभरातील विविध राज्यांत मागणीप्रमाणे लसीचे डोस वितरित सुद्धा झाले आहेत आणि अनेक मागण्या पूर्ण करण्याचे काम सुद्धा सुरु आहे. त्याचप्रमाणे २ टप्यामध्ये लसीकरणही सुरु झाले. सध्य स्थितीत भारतातील करोडो जनतेने कोरोनावर मात केली आहे. यामध्ये आपल्या अत्याधुनिक उपचार पद्धती आणि सुविधा त्याचप्रमाणे योग आणि आयुर्वेदाचा फार मोठा वाटा आहे. करोडो जनता कोरोन व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी घरामध्ये राहून आयुष काढा पीत होते त्याचबरोबर व्यायाम आणि योगाची साथ होती. याआधीही पतंजलीने कोरोनासोबतच विविध आजारांवर औषधं निर्माण करून बाजारामध्ये उपलब्धता करुन दिली आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.