27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeInternational Newsअमेरिकेच्या यानाचे मंगळावर लँडिंग

अमेरिकेच्या यानाचे मंगळावर लँडिंग

अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाचे पर्सिव्हरन्स रोव्हर नावाच्या यानाचे गुरूवारी मंगळ ग्रहावर लँडिंग झाले. मंगळावरील पाणी आणि सजीवसृष्टीचा तपास करण्यासाठी अतिशय धोकादायक भागावर जजिरो क्रेटरवर यशस्वी रित्या उतरले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरूवार आणि शुक्रवाराच्या दरम्यान रात्री दोन वाजता रोव्हरने मंगळावरील सर्वात धोकादायक जजिरो क्रेटरवर लँडींग केली. इतिहासातील ही सर्वात अचूक लँडींग असून पूर्वी या जागेवर पाणी असल्याचा दावा नासाने केला आहे. त्याचप्रमाणे इतर शोधाप्रमाणे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळ ग्रहावरून माती आणि खड्याचे नमूने देखील गोळा करून आणणार आहे. हा रोबोट सहा पायांचा असून ७ महिन्यान्म्ध्ये ४७ कोटी किमीचा प्रवास करून आपल्या ध्येयाजवळ पोहचला आहे. तेथील शेवटची ७ मिनट या रोबोटसाठी खुपच धोकादायक होती. यावेळी, याची  फक्त ७ मिनिट १२ हजार मैल प्रति तासावरुन ० वेगावर लँडिंग झाली. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही या लँडिंगचे दृश्य त्यांच्या कार्यालयातून पाहिले.

पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर आणि इंजीन्यूटी हॅलिकॉप्टर मंगळ ग्रहावर कार्बन डाय-ऑक्साईड मधून ऑक्सीजन बनवण्याचे काम करणार आहे. हे जमिनीच्या भुगर्भातील जीवनाचा आणि तिथे उपलब्ध असणारया पाण्याच्या शोधा संबंधी माहिती घेणार आहे. हा रोव्हर मार्स एनव्हार्यमेंट डायनामिक्स अॅनालायझर मंगळावरील हवामान आणि पाण्या संदर्भांत संशोधनपर अभ्यास करणार आहे. नासाच्या मार्स अभियानाचे नाव हे पर्सिव्हरेंस मार्स रोव्हर आणि इंजिन्यूटी हॅलिकॉप्टर असे ठेवण्यात आले आहे. पर्सिव्हरेंस रोव्हरचे वजन हजार किलोग्राम असून तो पूर्णत: परमाणू उर्जेवर चालतो. पहिल्यांदाच एखाद्या रोव्हरमध्ये प्लूटोनियम इंधनाचा वापर करण्याचा प्रयोग केला गेला आहे. हा पर्सिव्हरेंस रोव्हर मंगळ ग्रहावर किमान  दहा वर्षापर्यंत काम करू शकतो. यामध्ये नासाने सात फुटाचा रोबोटीक आर्म, तेवीस कॅमेरे आणि एक ड्रील मशीन समाविष्ट केलेली आहे. तसेच, या हॅलिकॉप्टरचे वजन दोन किलोग्राम आहे. नासाने असाही दावा केला आहे की, रोव्हरच्या संपूर्ण इतिहासातील मंगळावरील लँडींग सर्वात अचूक ठरणार आहे.

या रोव्हरने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचल्या नंतर त्वरितचं नासाने पहिले चित्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. जे मंगळावरील रहस्ये उघडण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाउल ठरेल असे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या ट्विटर हँडलवरून नासाने मंगळाकडे जात असणार्या रोव्हरचे छायाचित्र प्रसिद्ध केले. यासोबत नासाने या छायाचित्राला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, हॅलो वर्ल्ड, माझ्या स्वतःच्या घरातून माझा पहिला लुक. रोव्हरच्या दुसर्‍या बाजूचेही एक चित्र नासाने शेअर केले आहे. रोव्हरच्या सहाय्याने निश्चितच मंगळ ग्रहाच्या जेजेरो क्रेटरवरील सर्व रहस्ये उलगडणे अपेक्षित आहे. या अंतराळ मोहिमेत नासाचा पर्सिव्हरेन्स रोव्हर मंगळ ग्रहावर प्राचीन जीवनाचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, मंगळावर रोव्हरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर नासाच्या प्रयोगशाळेत उत्साहाचे वातावरण  पाहायला मिळाले. या प्रकल्पाचे व्यवस्थापक मिमी ऑन्ग मोठ्या उत्साहाने म्हणाले की, आमच्या टीमला मिळालेली मंगळावरील वातावरण परीक्षण करण्याची संधी आम्ही नक्कीच सिद्ध करू. शास्त्रज्ञाच्या मते, जेव्हा ग्रहावर पाणी उपलब्ध होतं  तेंव्हा मंगळ ग्रहावर कुठे सजीव वास्तव्यही असू शकेल. त्यांना आशा आहे, की अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यास या रोव्हरची मदत होईल. पर्सिव्हरन्स नासाद्वारे पाठवलं गेलेलं आतापर्यंतच नववं रोवर आहे. शास्त्रज्ञानी सांगितलं, की मंगळावर शेवटच्या सात मिनीटांचा रोवरला उतरवतानाचा वेळ अतिशय गंभीर होता. रोवरनं यशस्वरित्या लँडिंग केल्यानं शास्त्रज्ञानी प्रचंड आनंद झाला.

मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटर हा अतिशय दुर्गम भाग आहे. या एका ठिकाणी खोल घाट आणि खूप उंच डोंगरही आहेत. यासोबतच इथे असणारे भले मोठे दगड याला आणखीच भयानक बनवतात. यामुळे पर्सिव्हरन्स रोवरच्या लँडिंगकडे सगळ्यां जगाचेच लक्ष लागले होते. अमेरिका हा मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर पाठवणारा जगभरातील पहिला देश ठरला आहे.

- Advertisment -

Most Popular