27 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsराज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक

राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक जास्तच प्रमाणत वाढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक  इत्यादी शहरांमध्ये कोरोनाचा संसर्गत प्रचंड वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये नव्याने 27 हजार 126 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील आत्ता पर्यंतची झालेली ही सर्वात मोठी नोंद आहे. तसेच आज कोरोना संसर्गामुळे राज्यात 92 रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू झाले आहे असे दिसण्यात येते आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये 2 हजार 982 नवीन कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद केली गेली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुन्हा जाहीर केली गेली आहेत. पुन्हा रुग्णांची संख्या दिवसगणीक वाढतचं चाललेली दिसत आहे. पालिकेकडून मुंबईतील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मिशन टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील काही मॉल्स, बस, रेल्वे  स्थानकांसह इतर ठिकाणी अँटिजेन चाचण्या करवून घेतल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णसंख्येने मुंबईमध्ये उच्चांक पटली गाठल्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर भुमिका घेतली आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्टड इत्यादी  ठिकाणी कोरोना अँटिजेन टेस्ट केली जात आहे. दररोज 50 हजार तरी चाचण्या करण्याचे पालिकेने लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. तसेच या चाचण्या करण्यासाठी इन्कार करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या 26 मॉलमध्ये प्रवेश करणर्या प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन टेस्ट केली जाणार असून जर रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दिवसाला प्रत्येक मॉल मध्ये किमान 400 टेस्ट केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.

maharashtra corona phase 2 vaccinataion

मुंबईतील प्रसिद्ध रुणवाल, इन्फिनीटी, इनॉर्बिट, पॅलेडियम, फिनिक्स यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये कायम गर्दी असते त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी या चाचण्या केल्या जाणार आहेत. या सर्व मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अँटिजेन चाचणी बंधनकारक केली गेली आहे. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता पालिकेने उचललेले पाऊल नक्कीच योग्य आहे, असे केल्याने होणार्या मोठ्या प्रमांतील गर्दीला आळा बसेल. त्या व्यतिरिक्त गर्दीच्या प्रत्येक वॉर्डमधील दररोज 1 हजार टेस्ट करण्याचे टार्गेट ठरवीण्यात आले आहे. यात मुंबईतील अनेक गर्दीच्या ठिकाणांना समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष करून मुंबईमधील रेस्टॉरंटस्, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, विविध चौपाट्या, खाऊ गल्ली, फेरीवाले, वेगवेगळी सरकारी, निम सरकारी कार्यालये या ठिकाणी या चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच 9 मुख्य रेल्वे स्थानकांवर या चाचण्या केल्या जाणार आहे. मुंबईतील बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली वांद्रे, दादर इत्यादी स्थानकांवर या चाचण्या केल्या जाणार आहे. दर दिवशी या ठिकाणी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या करण्याचे ध्येय आहे. विशेषकरून गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. तसेच मुंबईतील मुख्य बसस्थानकांवरही कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. मुंबईतील परळ, बोरिवली, कुर्ला-नेहरु नगर ,मुंबई सेंट्रल  येथे दररोज एक हजार प्रवाशांच्या टेस्ट केल्या जाणार आहेत.

राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई या मोठ्या शहरांसह अनेक लहान शहरांमध्येही कोरोनाचा कहर वाढला आहे. विशेष म्हणजे हा कोरोना आता गाव-खेड्यातही शिरकाव करू लागला आहे. प्रत्येक शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या भांडावून सोडणारी आहे. आज दिवसभरात पुण्यामध्ये एकूण 2900 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईमध्ये एकूण 3775 रुग्ण आढळलेत. त्याच प्रमाणे  नागपुरामध्येही नवीन 3614 रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे वातावरण चिंताग्रस्त झाले आहे. मुंबईमध्ये 1647 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 23 हजार 448 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची अनेक कारणं असतील, परंतु त्याचे वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, लोकांना वाटत आहे कि, कोरोना संपलेला आहे. आणखी काही दिवस लोकांनी शासनाने केलेल्या नियमांचं पालन करणे अत्यावश्यक आहे. तरच शासनाच्या या धोरणाला यश मिळू शकते.

- Advertisment -

Most Popular