32 C
Mumbai
Friday, May 24, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsअमेरिकेमध्ये अनोख्या बाळाचा जन्म

अमेरिकेमध्ये अनोख्या बाळाचा जन्म

अमेरिकेमध्ये एका अनोख्या बाळाचा जन्म झाला असल्याचा दावा तेथील बालरोगतज्ञांनी केला आहे. कोरोना महामारीने जगात सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कमी झालेला संसर्ग पुन्हा वेगाने वाढल्याची लक्षणे निदर्शनास येत आहेत. अशातच संपूर्ण जगामध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यासारखा पसरत आहे. परंतु, अमेरिकेतील बालरोग तज्ञांनी केलेल्या विशेष दाव्याने जगासमोर एक सकारात्मक माहिती आली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार  अमेरिकेमध्ये जन्मलेल्या एका नवजात बालकाच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. अँटिबॉडिज म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही विषाणूंशी प्रतिकार करण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या प्रथिनांना म्हटले जाते. कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळ जन्माला येणं, असं याधी कधीही घडले नसून हे पहिल्यांदीच घडलं आहे. आईला गरोदरपणामध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस तिला देण्यात आला होता. कोरोना प्रतीबंधित मॉर्डना लसीचा डोस बाळाच्या आईला गरोदरपणाच्या 36व्या आठवड्यात देण्यात आलेला होता. संबंधित महिलेने एका निरोगी बाळाला जन्म कोरोन प्रतिबंधित लसीचा डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नाळेतील रक्ताचे नमुने घेतले असता बाळाच्या रक्तामध्ये अँटिबॉडिज आढळून आल्या असा डॉक्टरांनी खुलासा केला. परंतु, अजून या शोधाचं पुनरावलोकन केलं गेलेलं नाही. एखाद्या न्यू बोर्न बाळाच्या शरीरामध्ये कोरोना अँटिबॉडिज निर्माण झाल्याचे हे पहिलं वहिलचं प्रकरण असल्याचे फ्लोरिडा अटलांटिक विश्वविद्यालयाचे सहलेखक पॉल गिल्बर्ट आणि चाड रूडनिक यांनी सांगितलं आहे, याआधी असा कोणीही दावा केल्याचे निदर्शनात नाही.

बाळाच्या आईला नियमांनुसार, २८ दिवसानी कोरोना प्रबंधित  लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच बाळाची आई आणि बाळ या दोघांची प्रकृत्तीही उत्तम असून बाळाची आई नियमितपणे बाळाला स्तनपान करत असल्याने बाळाला योग्य पोषण मिळत आहे. तसेच , कोरोनामुक्त झालेल्या गरोदर स्त्रियांच्या बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात जोडलेली नाळ यशस्वी ठरत नसल्याचं आधीच्या एका संशोधनात सांगण्यात आलं होतं आणि  या नव्या संशोधनात असे दिसून आले आहे कि, जर आईला कोरोनाची गरोदरपणामध्ये कोरोना प्रतिबंधित लस देण्यात आली असेल, तर त्यामुळे बाळाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज जाण्याची शक्यता निर्माण होते. तसेच यामुळे होणारा बाळाला कोरोनाचा संसर्गचा  धोका कमी होतो.

तज्ञ पॉल गिल्बर्ट आणि चेड रुडनिक यांनी या संशोधना संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. कारण नवजात बालकामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या या अँटिबॉडीज आढळण्याची वेळ ही प्रथमच आहे.  हे मूल जन्मला येताच तज्ज्ञांनी त्या बाळाच्या नाळेतील रक्ताची तपासणी केली असता, त्यामध्ये अँटिबॉडीज  आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या महिलेच्या डिलिव्हरीपूर्वी तीन आठवडे अगोदर तिला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला गेला होता. व २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार होता,परंतु, त्याआधीच तिची मुलगी जन्माला आले होते. परंतु, या बाळाच्या रक्तात सापडलेले अँटिबॉडीज त्याचे कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यास किती उपयुक्त आहे हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. याबाबतीत अजून संशोधन करावे लागणार आहे. परंतु, जन्मताच रक्तामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज निर्माण असलेले जगातील पहिले मूलाने अमेरिकेतील फ्लोरिडात जन्म घेतला आहे, याला वृत्ताला तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे या कोरोनाच्या महामारीत काहीतरी सकारात्मक घटना घडल्याने तज्ञामध्ये नवी आशा पल्लवित झाली आहे.

- Advertisment -

Most Popular