आयपीएल 2020 अंतिम सामन्यांमध्ये पुन्हा एकदा म्हणजेच सलग पाचव्यादा मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनि पराभव करून इंडियन प्रीमिअर लीगची ट्रॉफी पटकावली. मुंबई कडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक केले. त्याआधी संघातील बोल्ट आणि नॅथन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सचा खेळ 156 धावांवर रोखून धरला.
मुंबई इंडिअन्सने पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खेळ करून दिल्लीला केले गारद.. कर्णधार रोहित शर्माने 51 चेंडूमध्ये 68 धावा करून त्यामध्ये 4 षटकार आणि 5 चौकार मारून धुवांधार खेळी केली. ईशान किशनने त्याला तेवढीच दमदार साथ देऊन 19 चेंडूमध्ये 33 धाव केल्या. त्याचप्रमाणे संघातील डिकॉकने 12 चेंडूत 20 धावा, सूर्यकुमार यादनवने 20 चेंडूत 19 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी स्वीकारून मुंबई इंडियन्सला 157 धावांचे लक्ष्य दिले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 65 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीची सुरुवात खराब झाली. त्यांच्या संघातील धडाकेबाज खेळाडू स्टॉईनिस हा एकही रन न करता तंबूत परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे दोन धावा करुन बाद झाला. त्या पाठोपाठ शिखर धवनही बारा चेंडूत केवळ पंधरा धावा करून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी शह्यांणव धावांची भागीदारी केली.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पन्नास चेंडूत नाबाद पासष्ट धावांची खेळी केली, तर ऋषभ पंतने अडतीस चेंडूत छप्पन धावांची खेळी केली. अय्यरने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. तर ऋषभ पंतने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. फायनल सामन्यानंतर मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या समर्थकांना मध्ये जोरदार स्टेटसबाजी रंगली. सर्वत्र मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माचा बोलबाला दिसत आहे.
पाच ट्रॉफ्या जिंकणारा एकमेव कर्णधार, सर्वात जास्त सहा ट्रॉफ्या जिंकणारा व मुंबईकडून 4000 धावा करणरा एकमेव खेळाडू तसेच एकपण अंतिम मॅच न हरलेला एकमेव खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून सोशल मिडिया वर मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा वर मेमेज चा पाऊस पडत आहे. वेगवेगळे फोटो मेसेज स्प्शाल मिडिया वर ठेऊन मुंबई इंडिअन्सवर शुभेछा वर्षाव होत आहे.