30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleस्थूलता – एक गंभीर समस्या

स्थूलता – एक गंभीर समस्या

ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. शरीरामध्ये अति जास्त प्रमाणत उष्मांक सेवन होऊन जर त्याचा योग्य वेळी निचरा झाला नाही तर त्याचे रुपांतर चरबीत होते. चरबीच्या पेशी जशा वाढत जातात त्याप्रमाणे शरीराचे वजन सामान्य वजनापेक्षा अतिरिक्त वाढायला सुरुवात होते. यालाच स्थूलपणा किंवा लठ्ठपणा म्हणतात. एखादी व्यक्ती किती प्रमाणत स्थूल आहे हे पाहण्यासाठी बर्याच वैद्यकीय शास्त्रामध्ये विविध चाचण्या दिल्या आहेत. त्यातील एखाद्या चाचणीची आपण थोडक्यात माहिती बघूया.

आज आपण बी एम आय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स या चाचानिबद्दल माहिती बघू. आपल्या वजनाला आपल्या उंचीने भागले असता येणारा आकडा म्हणजे बी एम आय होय. ओबेसिटी मोजण्याचे हे सर्वात चांगले एकक आहे. स्थूलता हा खूप मोठा आजार आहे, त्यावर वेळीच लक्ष देऊन उपचार केले तर तो वेळीच आटोक्यात येऊ शकतो.

obesity leads to disease

स्थूलता वाढण्याची सर्वात जवळच कारण म्हणजे आपली हल्लीची जीवनशैली . शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त उष्मांक साठले की त्याचे रुपांतर चरबीमध्ये होऊन स्थूलता ज्या प्रमाणे वाढते, त्याचप्रमाणे अजूनही काही कारणेआहेत, जसे कि अनुवांशिकता. घरातील जेष्ठ व्यक्तीमध्ये जर स्थूलतेचे प्रमाण जास्त असेल तर अनुवंशिकतेने ते मुलांमध्ये पण येण्याची शक्यता असते. स्थूलता हि हार्मोनल बदल, योग्य आणि वेळेवर ण घेतलेल्या आहारामुळे, धावपळीची जीवनशैली, व्यायामाची कमतरता, जंकफूड चे जास्त प्रमाणत सेवन , विविध प्रकारची व्यसने इ. गोष्टीमुळे वाढते. अलीकडच्या कोरोना संसर्ग काळामध्ये वर्क फ्रॉम होम ची गरज जास्त वाढल्याने वजन वाढण्याच्या प्रमाणात खूपच वाढ झाली आहे. त्यामुळे लठ्ठपणाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हृदयाचे विकार, पाठदुखी, पक्षघात, मूत्रपिंडाचे विकार, महिलांच्या अनियमित पालीच्या समस्या, स्तनांचा, गर्भाशयाचा कर्करोग इ. अनेक प्रकारच्या विविध शारिरीक व्याधिना सामोरे जावे लागते.

त्यामुळे स्थूलतेमुळे होणारे विकार टाळण्यासाठी सुरुवात वजन वाढू न देता नियंत्रित ठेवण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. या धावपळीच्या जीवनात पौष्टिक आहाराचा आपल्या आहारात कसा समावेश करता येईल याकडे जातीने अक्ष देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पौष्टिक आहार बरोबर योग्य प्रमाणत व्यायामाचे नियोजन होणे आवश्यक आहे. बर्याचदा व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम करणे शक्य हॉट नाही. परंतु नियमित व्यायाममध्ये सुद्धा विविधता असणे आवश्यक आहे. जसे कि चालणे, जॉगिंग, पोहणे, योग, नृत्य असे बरेच प्रकार आहेत.

सध्याच्या कोविड संक्रमण काळात झालेल्या संशोधनामुळे स्थूल व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग आणि त्यात येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहेत. स्थुलतेचा  रुग्णांच्या प्रतिकार क्षमतेवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लोकं कोरोनाशी लढा द्यायला शारिरीक रित्या असमर्थ ठरतात.

त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी वजनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. वजन नियंत्रणात आणून Stay Healthy & Stay Flexible हा मंत्र सर्वजण जीवनशैलीत समाविष्ट करून घेऊयात.

- Advertisment -

Most Popular