Thursday, August 5, 2021
HomeEntertainmentबिग बॉस मधील स्पर्धक जानकुमार सानूला मनसेचा सज्जड दम

बिग बॉस मधील स्पर्धक जानकुमार सानूला मनसेचा सज्जड दम

कलर्स वाहिनीवरील सुरु असलेला बिग बॉस रिअलिटी शो कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असतो. या सीजन ला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा सुपुत्र जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची मला चीड आहे, अशा संदर्भाचे वक्तव्य जानकुमार सानूने केले आहे. यावर मनसेने त्याला चांगलाच सज्जड दम दिला आहे. जानकुमार सानू याच्या वक्तव्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटर प्रोफिईलला ट्वीट करत म्हटलं आहे कि , जान कुमार सानू, तुला मराठी भाषेची चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणर लवकरच. आता आम्ही मराठी मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.

वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरचं झाले, याआधीही बर्याच सिने कलाकारांनी मुंबई आणि मराठी भाषेबद्दल अशी वक्तव्य केलेली, त्यांना सुद्धा योग्य प्रकारे उत्तर देण्यात आली आहेत. वाहिनीने हा सीन न वगळता राज्याशी गद्दारी करणाऱ्यांची तोंड समोर आणली आहेत, असे देखील खोपकर यांनी ट्वीट केले आहे. त्याचप्रमाणे पुढे खोपकर म्हणाले आहेत कि जर कलर्स वाहिनी आणि जानकुमार सानू यांनी जर पुढील २४ तासांमध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉस रिअलिटी शोची शूटिंग तर बंद पाडूच आणि जानकुमार सानुचे थोबाड फोडून त्याला भविष्यात कुठेही काम मिळणार नाही याची सुद्धा व्यवस्था करू.

jaan kumar sanu big boss

बिग बॉस सीजन १४ मध्ये काही ना काही गोंधळ चालूच असतो. बॉलीवूड मधील गेले काही महिने विशेष चर्चेत असलेला नेपोटीझमचा मुद्दा, तो आत्ता बिग बॉस च्या घरातसुद्धा येऊन पोहोचला आहे. परंतु जन्कुमार वर नेपोटीझमचा आरोप झाल्यावर मात्र त्याच्या आईने तो आरोप फेटाळून लावला आहे. जान मध्ये असलेले प्रतिभाशाली गुण त्यामुळेच जनता आणि घरातील देखील त्याच्यावर प्रेम करतात.

या संदर्भात त्याचे वडील तसेच सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे कि, वडिल या नात्याने माझ्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल मी केवळ तुमची माफी मागू शकतो. माझ्या कानावर अशी बातमी आली आहे कि , माझ्या मुलाने असे काहीतरी वक्तव्य केलं, जे गेल्या 41 वर्षांमध्ये माझ्या मनात कधीच आलं नाही. महाराष्ट्र, मुंबई आणि मुंबा देवीने मला नाव, प्रसिद्धि देऊन मोठे केले आहे. त्यामुळे मी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशा गोष्टींचा कधी विचारही करू शकत नाही. माझं भारताच्या सर्वच भाषांवर प्रेम असून मी त्यांचा सन्मान करतो. मी विभिन्न भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments