सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला हे कोविशील्ड लसीच्या किंमतीमुळे वादात सापडलेले असल्याने यांना वाय श्रेणीची सुरक्षा केंद्राकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. पूनावाला यांना धमकीचे फोनही येऊ लागल्याने निर्माण होणार्या धोक्याची भीती लक्षात घेऊन त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यापुढे सिआरपीफच्या 4-5 कमांडो सोबत, 11 सुरक्षा कर्मचारी पुनावाला यांच्या सोबत देशभरात कुठेही गेले तरी असतील. 16 एप्रिलला सिरमचे डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून यामध्ये अदर पूनावाला यांना सुरक्षा पुरवण्यासंबंधी मागणी करण्यात आली होती.
सीरम इंस्टीट्यूटमध्ये कोवीशील्ड हे कोरोना व्हॅक्सीन बनवले जाते. नुकत्याच राज्यानुसार वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या किंमतीवरून इंस्टीट्यूट वादात आलेले. त्यांनी राज्यांसाठी कोवीशिल्ड 400 रुपयांमध्ये विक्री करण्याची घोषणा केली होती, तर केंद्र सरकारसाठी विक्री किंमत 150 रुपये इतकी होती. बऱ्याच विरोधी नेत्यांनी हा मुद्दा ताणून धरला होता आणि सोशल मिडीयावरही कोणताही ज्वलंत विषय जसा ट्रेंड होतो तसा वन व्हॅक्सीन वन प्राइज हा विषय ट्रेंड होत होता. त्यानंतर बुधवारी, सीरम इंस्टीट्यूटने राज्यांसाठी लसीच्या किंमतीमध्ये 25% कपात करुन किमत 400 वरून कमी करून 300 रुपये करण्याची घोषणा केली.
केंद्र सरकारकडून दिली जाणारी ही सुरक्षा 6 प्रकारामध्ये वर्गीली जाते, म्हणजेच X, Y, Y+, Z आणि Z+ आणि एसपीजी या ६ प्रकारच्या कॅटेगिरीची सुरक्षा या आहेत.
X श्रेणी सुरक्षा :
यामध्ये दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी 24 तास सुरक्षा तैनात करतात. म्हणजेच, आठ-आठ तासांच्या शिफ्टमध्ये एकूण सहा पीएसओ तैनात असतात.
Y श्रेणी सुरक्षा :
यामध्ये दोन पीएसओ आणि एक सशस्त्र गार्ड चोवीस तास सुरक्षेला हजार असतो. यामध्ये एकूण 11 सुरक्षारक्षक असून, पाच स्टेटिक ड्यूटीवर आणि 6 वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात केलेले असतात.
Y+ श्रेणी सुरक्षा :
यामध्ये Y कॅटेगरी प्रमाणेच सुरक्षा दिली जाते. त्यामध्ये 11 ते 22 पीएसओ तैनात असतात, अधिकाऱ्यांनुसार पीएसओसाठी एक एस्कॉर्ट वाहन उपलब्ध करून दिलेले असते.
Z श्रेणी सुरक्षा :
यामध्ये 22 सुरक्षा रक्षक संरक्षणासाठी कार्यरत असतात तर, 2 ते 8 सशस्त्र गार्ड घरी असतात सुरक्षेसाठी तैनात असतात, तसेच दोन पीएसओ चोवीस तास कार्यरत असतात. रस्त्यांवरुन प्रवास करताना देखील तीन सशस्त्र जवान एस्कॉर्टमध्ये असतात.
Z+ श्रेणी सुरक्षा :
यामध्ये Z कॅटेगिरीच्या सुरक्षेव्यतिरिक्त या कॅटेगिरीमध्ये जास्त सुविधा असतात, यात एक बुलेट प्रूफ कार, तीन एस्कॉर्ट आणि आवश्यकता असेल तर, अतिरिक्त सुरक्षाही मिळून जाते.
SPG श्रेणी सुरक्षा :
ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च आणि डेव्हलपमेंच्या रिपोर्टनुसार एसपीजी केवळ पंतप्रधान आणि इतर व्हीआयपींना सुरक्षा देण्यासाठी या श्रेणीचा अवलंब केला जातो.