26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsमन की बात डॉ. शशांक जोशींसोबत

मन की बात डॉ. शशांक जोशींसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात देशामध्ये घडणाऱ्या विविध घटकांबद्दल  चर्चा केली गेली. यामध्ये कोरोना व्हायरस संकटात अविरत, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा आणि उपचार करणारे डॉक्टर, नर्स, रुग्णवाहीका चालक, कोरोनातून सुखरूप बरे होऊन बाहेर पडलेले अनेक नागरिक यांसह अनेक पडद्यामागील कार्य करणाऱ्या इतर लोकांचाही समावेश आहे. या वेळेच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रामुख्याने कोरोनाशी लढा देणारे फ्रंट लाईन वर्कर्स ज्यांचा उल्लेख कोरोना योद्धा म्हणूनही केला जातो यांच्या बद्दल बातचीत केली गेली. या कार्यक्रमात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांचा सह्भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. शशांक जोशी यांच्यासोबत मन की बात  कार्यक्रमात संवाद साधला.

पंतप्रधानांनी सर्व प्रथम डॉ. शशांक जोशी यांचे यांच्याशी बोलताना कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले ‘डॉ. शशांक जोशी, आपण जे विचार स्पष्ट केले. या विचारांमधील स्पष्टवक्तेपणा मला आवडला. आपण सध्या दिवसरात्र कार्यामध्ये मग्न आहात. आपण लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल मार्गदर्शन करायला हवे. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. शशांक जोशी यांना कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा कशाप्रकारे वेगळी आहे, हे स्पष्ट करायची विनंती केली. तसेच या लाटेत आपण काय काळजी घ्यायला हवी? याबाबत विचारणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देताना डॉ. शशांक म्हणाले कि, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये कोविड विषाणूचा संसर्ग होण्याचा वेग सर्वांधिक आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक ताकदवान असल्याचे निष्पन्न होते. पण, यात विशेष गोष्ट अशी पण आहे की, कोरोनाची दुसरी लाट कितीही शक्तिशाली असली तरीही या लाटेमध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहेचं, पण, काळजी या गोष्टीची आहे कि, मागच्या वेळेच्या संक्रमणाच्या तुलनेत या लाटेमध्ये तरुण आणि लहान मुलांमध्येही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. कोरोनामुळे लोक घाबरून गेल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. घाबरून जाण्याची गरज नाही आहे. 80% लोकांना लक्षणंच दिसून येत नाहीत, केवळ म्युटेशनमुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नसल्याचे डॉ. शशांक यांनी मन की बात  कार्यक्रमा मध्ये पंतप्रधानांना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांनी पुढे विचारले की, कोरोनावर होणारी उपचार पद्धती, उपाययोजनांबाबत तसेच कोरोना निर्बंधित करणाऱ्या काही औषधांच्या मागणीबाबत लोकांना तुम्ही काय माहिती शेअर कराल ! यावर डॉ. शशांक यांनी सांगितले की, अनेक लोक उगाचच घाबरुन राहतात, घाबरण्याने मन अस्थिर होऊन अनेक रोग बळावतात. कोरोनाच्या भीतीमुळे जर काही त्रास जाणवत असेल तर रोजच्या उपचारासाठी सुद्धा रुग्णालयात न उपचार घेता, दुखणं अंगावर काढत राहतात. वेळीच रुग्णालयात भरती झाल्याने योग्य उपचार घेणे शक्य होते. तसेच, मोबाईलवर प्राप्त झालेल्या माहितीवर जास्त विश्वास ठेवतात, सगळ्याच गोष्टी खर्या असतील असे नाही. त्यांची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. कोरोनाची औषधं अत्यंत स्वस्त दरात मिळतात. उगाचच महागड्या औषधांमागे धावण्यात काहीही अर्थ नाही. उगाचच लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाल्याचही डॉ. शशांक म्हणाले.

- Advertisment -

Most Popular