Saturday, June 19, 2021
HomeEntertainmentBollywoodदीपिका पादुकोणचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

दीपिका पादुकोणचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिच्या सर्व कुटुंबाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तिचे वडील जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना घरामध्ये प्रथम कोरोनाची लागण झालेली. त्यानंतर सर्व कुटुंबांनी टेस्ट केली असता सर्वांचे रिपोर्ट पोझीटिव्ह आले. प्रकाश यांच्यावर बंगळुरूच्या भगवान महावीर जैन रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच प्रकाश पादुकोण यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं आणि सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये पूर्वीपेक्षा चांगला फरक जाणवत आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यावर येत्या २ दिवसामध्ये त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकाश पादुकोण यांच्या सोबतच कुटुंबातील दीपिकाची आई उज्ज्वला आणि बहीण अनिशा यांनाही कोरोनाची काही लक्षणं आढळून त्रास जाणवू लागल्याने त्यांची सुद्धा चाचणी केली असतात त्या दोघीही संक्रमित झाल्याचे कळले, मात्र दोघींचीही प्रकृती आता ठीक असून त्यानी होम आयसोलेशन पर्याय निवडला आहे. प्रकाश पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता आणि काही दिवसांच्या फरकानंतर ते दुसरा डोस घेणार होतेत. मात्र, दुसरा डोस घेण्यापूर्वीच्या कालावधी आधीच त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आणि योग्य उपचार मिळावेत याकरिता ते रुग्णालयात दाखल झाले.

deepika padukon family finds covid positive

भारताला बॅडमिंटन विश्वामध्ये मानाचं नाव कमावून देणाऱ्या प्रकाश पादुकोण हे सध्या 65 वर्षाचे आहेत. बॅडमिंटन विश्वामध्ये 1980 साली प्रकाश पादुकोण यांना फर्स्ट रॅंकिंग मिळाले होते, तसेच अजूनही  त्यांची ओळख जगातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून आहे. त्याच साली जगातील सर्वात मोठी मानली जाणारी ऑल इंग्लंड ओपन ही टूर्नामेंटही त्यांनी जिंकली होती. ही ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय ठरले होतेत. इतकंच नाही तर कॅनडा येथे 1978 मध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी सिंगल्स कॅटेगरीत सूवर्णपदक पटकावलं होते. प्रकाश पादुकोण यांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमधील कारकिर्दीची यादी खूपच मोठी आहे. 1972 साली प्रकाश पादुकोण यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 1982 सालामध्ये पादुकोण यांनी बॅडमिंटन विश्वामध्ये देशाचे नाव उंच शिखरावर नेल्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

प्रकाश पादुकोण हे स्वत: 65 वर्षाचे आहेत, परंतु अख्खं आयुष्य खेळामध्ये गेल्याने, अजूनही ते रोज व्यायाम करून आरोग्याची योग्य काळजी घेतात, कोरोना हा केवळ कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्याना किंवा नाजूक शरीरयष्टी असणाऱ्यांनाच होतो असं नाही, प्रकाश यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन न करतात्याचे योग्य रित्या पालन करून घरीच रहा. जितकं शक्य आहे तितकी सर्वांनी आपल्या स्वास्थ्याची स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भारताला घातलेला हा कोरोनाचा विळखा सुटण्यास मदत होईल.

दीपिकानेही अलिकडेच कोरोना  काळातील मानसिक आरोग्याबाबत काही महत्त्वाचे माहिती सांगितली होती. ती म्हणाली होती की, कोरोनाच्या या संकटामध्ये प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाच्या शारीरिक स्वास्थाबरोबरच, मानसिक स्वास्थाबाबतही जागरूक राहणे गरजेचे आहे. मानसिक संतुलनही सक्षम असणे काळाची गरज बनली आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments