कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवून अख्ख्या जगाला नामोहरम केले आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रमाणामुळे जपानमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता 23 जुलै 2021 पासून प्रारंभ होणारे ऑलिम्पिक सुद्धा रद्द होण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवली आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता आयपीएल-2021 अनेक खेळाडूंना झालेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिक सुरू व्हायला फक्त 10 आठवडे शिल्लक राहिले आहेत. जपानचे लोकानी त्याचे कोरोना सुपरस्प्रेडर इव्हेंट असे नामकरण केले आहे. घेतल्या गेलेल्या सर्व्हेंमध्ये 80 टक्केपेक्षा जास्त लोक या स्पर्धेच्या नियोजनाच्या विरोधातच आहेत. पूर्वनियोजित योजने नुसार पुढे जाण्यास वचनबद्ध असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोकियो प्राधिकरणाचे म्हणणे आहे. जपान सरकारने देशातील कोरोनाचा संसर्ग प्रमाणाबाहेर आणि वेगाने वाढल्याने कडक निर्बंधित लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील या ओसाका, क्योटा, ओकियो आणि ह्योगो सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये 23 एप्रिल ते 11 मे दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे लॉकडाउन जास्त दिवस वाढवण्याच्या विचारात सर्व अधिकारी आहेत. यामुळे ऑलिम्पिक खेळांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या धोक्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील होणारी स्पर्धा 23 जुलै 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रमाण दिवसागणिक वाढत असताना सुद्धा 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा प्रारंभ होणार आहे. कोरोना महामारीमुळे या स्पर्धेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विदेशी खेळाडूंचे सराव आणि जपानच्या वातावरणाशी समरस होण्यासाठी 500 पेक्षा जास्त शहरांमध्ये शेकडो शिबिरे राबवण्यात आली होती. यासाठी गेल्या चार वर्षांपासून 41 हजार गटांना तयार करण्यात आले होते. प्रत्येक संघ व त्यांच्या गरजेनुसार सुविधांचीही सोय करण्यात आलेल्या. मात्र कोरोनाने आलेल्या या संकटाने तेथील लोकांचा आयुष्यातील सुंदर अनुभव हिरावला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली गेल्याने जगभरातील खेळाडूची राहण्याची व्यवस्था कुठे होईल, हे अद्यापही निश्चित करण्यात आली नाही. टोयामा राज्यातील कुरुम्बे शहरात एक्स्चेंज प्रमोशन विभागाच्या प्रवक्त्या हारुना टेराडा यांनी सांगितले कि, प्रत्येक जण इथे निराशाजनक परिस्थितीमध्ये जगत आहे. भारतीय तिरंदाज संघासाठी समुदायाने करार केला होता. करारानुसार भारतीय खेळाडूंना सण-उत्सव, कला व संगीत असे कार्यक्रम प्रदर्शित करायचे होते. तसेच खेळाडूंच्या प्रशिक्षणा आणि सरावासाठी शाळा-महाविद्यालयामध्ये सोय केली गेली होती. आता पुढे मात्र कडक नियमांत खेळाडू शहरात दाखल होतील, असे त्यांना वाटते आहे. मात्र, कोरोना प्रोटोकॉलमुळे स्थानिक विद्यार्थी व रहिवाशांसोबत प्रत्यक्ष संपर्क करता येणार नाही. भारतीय हॉकी संघासाठी दक्षिण जपानमधील शिमाने राज्यातील इजुमो शहराने ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिराकरिता 36 कोटी रुपये खर्च केलेले होते. मात्र आता ही योजना रद्द करण्यात आली असून, शहराचे प्रवक्ते शेरो हसेगावा सांगतात कि अनेक वर्षांपासून आम्ही या स्पर्धेसाठी उत्साहित होतो. मात्र कोरोना महामारीची सध्य स्थिती पाहता हे यावर्षी तरी होणे शक्य नसल्याने, आम्ही ते रद्द केले.