30 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeIndia Newsकोविन लसीकरण पोर्टलमध्ये बदल

कोविन लसीकरण पोर्टलमध्ये बदल

भारतामध्ये 18+ वयोगटातील सर्वांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिर्वाय केले आहे. काही दिवसांपासून कोविन पोर्टल योग्य रित्या ऑपरेट हॉट नसल्याच्या अनेक तक्रारी जनतेकडून नोंदविल्या गेल्या होत्या. या आलेल्या तक्रारीनंतर आता कोविन पोर्टलमध्ये बदल करण्यात आले आहेत. लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन ज्यांनी लसीकरण शेड्युल करून घेतल होता, पण काही कारणास्तव लस घ्यायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. अशा सर्वाना त्या शेड्युल प्रमाणे लस घेतल्याचे मेसेज आले होतेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या सर्व तक्रारीनंतर पोर्टलमध्ये बदल केले आहेत. पाहूया काय आहेत नवीन बदल आहेत ते थोडक्यात.

या नवीन बदलानुसार, व्हॅक्सीन रजिस्ट्रेशननंतर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, तर तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर 4 अंकी ओटीपी पाठविण्यात येईल, तो ओटीपी लसीकरण केंद्रावर दाखवावा लागेल. या ओटीपीद्वारे तुम्ही अपाइंटमेंट घेतल्याचे सिद्ध होईल. यामुळे व्हॅक्सीनेशच्या माहिती मध्येही काही गडबड गोंधळ उडणार नाही.

का करावा लागला बदल ?

कोविन पोर्टलवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये असे सांगण्यात येत होते की, ज्यांनी आधी अपॉइंटमेंट व्यवस्थित घेऊन बुक करून, पण अद्याप लस घेतलेली नाही. अशा लोकांना सुद्धा लस घेतल्याचे मेसेज येऊ लागल्याने तसेच त्यांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देखील वितरीत झाल्याने जनतेने केलेल्या तक्रारीनंतर मंत्रालयाने या पोर्टलमध्ये बदल घडवून आले होते. यानुसार, आता ओटीपीद्वारे लस घेतल्याची पुष्टी होईल.

पोर्टलवर अजून काही छोटेसे बदल करण्यात आले पाहूया थोडक्यात..

पोर्टलवर अजून काही छोटे आणि महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ओटीपी  शिवाय कोविन पोर्टलच्या डॅशबोर्डमध्येही बदल करण्यात आलेले दिसले आहेत. आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव सर्च केल्यानंतर 6 नवे ऑप्शन समोर दिसतील. या पर्यायांमधून योग्य वयोगटाचा पर्याय, तसेच कोणते व्हॅक्सीन घेणार त्याच्या नावावर क्लिक करणे जसे कि, कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन, त्यानंतर  फ्री किंवा पेड व्हॅक्सीन पर्याय दिला गेला आहे तो निवडावा.  या करण्यात आलेल्या बदलानंतर आता तुम्ही कोणती लस घेतली, याची देखील  माहिती मिळते.

cowin app registration

बदलानंतर कशी झाली आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस ?

सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरुन http://cowin.gov.in एंटर करुन कोविन पोर्टलवर जाऊन, तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या उजव्या बाजुला Register / Sign In Yourself  वर क्लिक करून, तुमचा मोबाइल नंबर टाईप करुन Get OTP पर क्लिक केल्यावर, मोबाइलमध्ये आलेला ओटीपी एंटर करुन वेरिफाय करुन घ्यायचा. यानंतर व्हॅक्सीनसाठी रजिस्टर करुन तुमचा फोटो आयडी प्रूफ, पूर्ण  नाव, लिंग आणि जन्मतारीख एंटर करायची आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घ्या.

- Advertisment -

Most Popular