30 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeLifestyleऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी प्रोनिंग

ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी प्रोनिंग

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आइसोलेट असलेल्यांसाठी नवीन सुधारित नियमावली जारी केली आहे, त्यामध्ये कोविड संक्रमित जे रूग्ण होम आइसोलेशन पर्यायामध्ये आहेत त्यांना काही वेळा श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने  वाढत जात आहे, त्यामुळे देशातील सर्वच आरोग्य यंत्रणा आणि लहान मोठी सर्वच रुग्णालये तणावाखाली आहेत. असेच काही रुग्ण घरीच आयसोलेट असल्याने त्यांची काही कारणास्तव ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास, डॉक्टरांनी स्वत: त्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर रुग्णाला श्वास घेण्यास अडचण जाणवत असेल तर तो प्रोनिंग पद्धत आजमावून पाहू शकतो. होम आइसोलेशनमध्ये राहणा-या संक्रमित रुग्णांसाठी ही प्रोनिंग पद्धती खूपच उपयुक्त पडणारी आहे. या पद्धतीमुळे आयसीयूमध्ये राहणा-या रूग्णांमध्येसुद्धा सकारात्मक रिझल्ट्स दिसून आले आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती भयावह बनली आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून गोंधळ निर्माण झालेला दिसत आहे. कोरोना डायरेक्ट फुफ्फुसांवर परिणाम करत असल्याने या रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते आहे पण ऑक्सिजन अभावी दररोज कितीतरी रुग्ण मृत्यू पावत आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि आरोग्य मंत्रालयाने जे रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी प्रोनिंगच्या काही विशिष्ट पद्धती सुचवल्या आहेत. वास्तविकता कोरोना रूग्णांसाठी प्रोनिंग पध्दत एक चांगली पद्धत आहे. होम आइसोलेशनमध्ये राहून रुग्णाने ही पद्धत अवलंबली तर तो शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास सुधार घडू शकतो. चला थोडक्यात जाणून घेऊया प्रोनिंग पद्धती बद्दल..

प्रोनिंग पद्धती म्हणजे नक्की काय ?

प्रोनिंगची ही पोझिशन श्वासोच्छवास घेण्यास आरामदायक आणि ऑक्सिकरण सुधारण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध अशी पद्धती आहे. ज्यामध्ये रूग्णाला प्रथम पोटावर झोपवले जाते. ही प्रक्रिया 30 मिनिटे ते दोन तासांपर्यंत पोझिशन बदलून करता येते. असे केल्याने फुफ्फुसांमधील ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने सुरळीत होते, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन सहज पोहोचतो आणि फुफ्फुसे चांगले कार्य करण्यास सक्षम बनतात. सुरळीत ऑक्सिजनेशनसाठी 80% पर्यंत ही प्रक्रिया यशस्वी मानली गेली आहे. तज्ञांच्या मते, रूग्णाला श्वास घेण्यास अडथला जाणवू लागताच रुग्णालयात जाण्यासाठी धावाधाव करण्याऐवजी ही प्रोनिंगची प्रक्रिया केली तर उपयुक्त ठरू शकते.

प्रोनिंग करण्याची योग्य पद्धत पाहूया थोडक्यात, 

प्रोनिंगसाठी सुमारे चार ते पाच उशांची गरज भासते, सर्वप्रथम पलंगावर नेऊन रुग्णाला पोटावर झोपवा, पुढच्या बाजूला गळ्याखाली एक उशी ठेवा, पुढे दोन उशा समान स्थितीमध्ये, मान, छाती व पोटाखाली येतील अशा ठेवा, उर्वरित दोन उशा पायाच्या पंजाखाली दाबून ठेवा, लक्षात ठेवा की या काळामध्ये कोरोना रुग्णाला दीर्घ व लांब श्वास घेत राहण आवश्यक आहे, सुमारे 30 मिनिटे ते दोन तासांपर्यंत या स्थितीत राहिल्यास रुग्णाला त्वरित खूप आराम मिळतो. पण लक्षात असू द्या कि, 30 मिनिटे ते दोन तासांदरम्यान रुग्णाची पोझिशन बदलत राहणे गरजेचे आहे. यावेळी एकदा रुग्णाला उजव्या बाजूला किंवा थोड्या वेळाने डाव्या बाजूला वळून झोपायला सांगू शकता.

- Advertisment -

Most Popular