2020 मध्ये कोरोना व्हायरस अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा द वीकेंड ऑस्ट्रेलियन च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. प्राप्त अहवालानुसार, चीनी सैन्य 6 वर्षांपासून कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्यासाठी कट तयार करत होते. या अहवालामध्ये एक वैशिष्टपूर्ण माहिती समोर आली आहे, ती म्हणजे, चीनमधील एका शोध निबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये सार्स व्हायरसच्या मदतीने चीन जैविक शस्त्र बनवत असल्याचे नमूद केलेले आहे. मिळालेल्या अहवालानुसार, 2015 साला पासूनच चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी यांच्यात कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा सुरु होती. त्यावेळी तिसर्या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून वापर करण्याचे चिनी शास्त्रज्ञांनी या व्हायरसबाबत असे म्हटले होते. त्यासोबतच त्याला योग्य प्रकारे हाताळत त्या व्हायरसचे महामारीत कसे रुपांतर करता येईल यावर देखील चर्चा आधीच झाली असल्याचे म्हटले आहे.
जैविक हत्यार म्हणजे विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया, बुरशी किंवा विषारी सुक्ष्मजीव, विषाणू तयार करून एखाद्या ठिकाणी नुकसान पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक सोडले जातात. या विषाणूंमुळे संबंधित परिसरात आजार पसरू शकतात. परिणामी मानव, प्राणी किंवा वृक्षांचा हळूहळू नाश होऊ शकतो. अँथ्रॅक्स, बोटुलिनम टॉक्झिन किंवा प्लेग यांच्या संसर्गजन्य आजारासारखे जैविक हत्यारच वापर केल्यास त्याचा सामाजिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम घडू शकतो. यामुळे अत्यंत कमी कालावधीमध्ये अनेकांचा मृत्यू ओढवू शकतो. आणि हे रोखणं कठीण असतं. जसे इबोला किंवा हास्सा विषाणूंचा वापर जैविक शस्त्राप्रमाणे केल्यास त्यातून विविध प्रकारचे साथीचे रोग निर्माण होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवून आणण्यासाठी, एखाद्या गोष्टीची दहशत निर्माण करण्यासाठी जैविक हत्यारांचा वापर केला जाऊ शकतो. जैविक हत्यारांचा वापर करणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. अशा प्रकारची हत्यारं वापरून जैविक हल्ला करण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केले आहे. जेंव्हा कोरोना व्हायरसच्या उदयाच्या तपासणी बाबतचा मुद्दा समोर येतो तेंव्हा प्रत्येक वेळी चीन माघार घेताना दिसली असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी आधीच स्पष्ट केले होते की, कोरोना व्हायरसचा संसर्ग कोणत्याही वटवाघुळच्या विष्टने पसरलेले नाही. कारण हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. रॉबर्ट यांनी चिनी रिसर्च पेपरवर सखोल अभ्यास केल्यावर म्हटले आहे की, हे संशोधन पेपर एकदम बरोबर असून आम्ही नेहमी चीनच्या रिसर्च पेपरवर अभ्यास करत राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना व्हायरसला चायनीज व्हायरस असे संबोधले होते. त्याला चीन सरकारच्या प्रवक्त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले कि, अमेरिकेने यापेक्षा परिस्थिती नियंत्रीत करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान रशियामधील माध्यमांनी अमेरिकन सैन्यानेच हा व्हायरस चीनमध्ये पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मात्र या गोष्टीवरून वाद निर्माण झाल्याने ट्रंप यांनी यापुढे हा शब्द वापरणार नाही असे म्हटलं आहे.