सध्याच्या कोरोना स्थितीपेक्षा जर स्थिती ठीक राहिली तर लवकरच अमेरिका आणि कॅनडानंतर भारतामध्ये 2 ते 18 वयोगटासाठी कोरोनाची स्वदेशी लस निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायल्सला मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. हे ट्रायल AIIMS दिल्ली, AIIMS पटना आणि मेडिट्रिना इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज नागपुरमध्ये 525 सब्जेक्ट्सवर करण्यात येतील. मंगळवारी हैदराबादमध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटीने भारत बायोटेकच्या प्रस्तावावर विचारविनिमय केला आहे.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, एक्सपर्ट्स कमेटीने कंपनीला तिसऱ्या फेजच्या ट्रायलसाठी CDSCO ने परवानगी देण्यापूर्वी, डेटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड DSMB ला दुसऱ्या फेजचा सुरक्षा डेटा प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही 24 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये प्रस्तावावर विचार करण्यात आला आणि भारत बायोटेकला रिवाइज्ड क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
यापूर्वीच, अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनतर्फे सोमवारी 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेक च्या कोरोना लसीला परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत या लसचा वापर 16 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या मुलांसाठी करण्यात येत होता. तसेच कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता कॅनडाने देखील अमेरिकेपाठोपाठ लहान वयोगटांच्या मुलांना लसीकारण करण्याला परवानगी दिली आहे. लहान मुलांच्या लासिकरणाला परवानगी देणारा कॅनडा हा पहिला देश ठरला आहे.
अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) अमेरिकेतील 12 वयोगटावरील बालकांना Pfizer ची कोरोना लस देण्याची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात तशा प्रकारच्या लसीकरणाला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, पुढच्या आठवड्यापासूनचं 12 ते 15 वयोगटातील मुलांचे कोरोनाचे लसीकरण करण्याचे नियोजनाची पूर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. अमेरिकेत या आधीच 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची लस देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या परिणामाचा आणि उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या काही महिन्यापूर्वी पासूनच केलेला आहे. त्यामध्ये ही लस कमी वयोगटाच्या बालकांवरही प्रभावी असल्याचं निष्पन्न झाले होते. त्यामुळे या आठवड्यामध्येच आता या लसीच्या वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतल्या वेगवान लसीकरणाच्या कार्यक्रमाने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविले आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10.5 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, 14.7 कोटी लोकांचा लसीचा किमान एक डोस देण्यात आलेला आहे.